शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
2
Arvind Kejriwal : "देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी
3
'तू नागपूरला ये नाहीतर मी बारामतीला येतो'; सुनील केदार यांचं अजित पवारांना चॅलेंज
4
मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, पण...; एकनाथ खडसेंची राजकारणातून निवृत्ती?
5
"मुंबई आणि भारतासाठी...", वर्ल्ड कपच्या तोंडावर इरफानला सतावतेय मोठी चिंता
6
या आठवड्यात सोन्याचे भाव कमी होतील की वाढतील? वाचा सविस्तर
7
'मालकाकडं बघून बैल खरेदी केल्याचं एक तरी...' आर आर आबांच्या रोहितने थेट पीएम मोदींना डिवचलं
8
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
9
Mothers Day : सचिनपासून रोहितपर्यंत...! भारतीय खेळाडू अन् त्यांना घडवणारी ती 'माऊली'
10
पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये अमेरिकाही हरवेल असं वाटतंय; PCB चा माजी अध्यक्ष संतापला
11
Exclusive: काँग्रेसचे शहजादे माओवाद्यांची भाषा बोलत आहेत; PM मोदींनी सांगितला NDA आणि इंडी आघाडीतला फरक
12
"ती स्वतःबद्दल इतकं बोलते की..."; विक्रमादित्य सिंह यांचा कंगना राणौतला खोचक टोला
13
ना तेंडुलकर, ना जयसूर्या! वसीम अक्रमने सांगितला ९० च्या दशकातील सर्वोत्तम फलंदाज
14
'NOTA चं बटण दाबा'; इंदूरमध्ये भाजपला धडा शिकवण्याचे काँग्रेसचे आवाहन!
15
अस्सी घाटावर पूजा, कालभैरवाचा आशीर्वाद...; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी PM मोदींचा वाराणसीत मेगा प्लॅन
16
"बाबा लवकर गेला हे एकार्थी चांगलं झालं, कारण...", वडिलांविषयी असं का म्हणाली सखी गोखले?
17
"ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, राणेंना रोखण्याची..."; फडणवीसांचा गौप्यस्फोट
18
Ashok Gehlot : राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
19
"आम्ही या हंगामात...", पराभवानंतर Hardik Pandya भावूक, दिली प्रामाणिक कबुली
20
माधुरीचा साधेपणा! 'साजन'मधील ड्रेस परिधान करुन पोहोचली पुरस्कार सोहळ्याला; 33 वर्ष जुना video viral

अंतराळात दिसणार भारताची ताकद! ISRO पाठवणार रोबोट, गगनयान मिशनआधी मोठी झेप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 1:41 PM

इस्रोने सूर्य मिशनसाठी आदित्य एल-1 लाँच केलं. आता इस्रोचा फोकस मानवी मिशन गगनयानवर आहे.

चंद्रयान-3 मिशनच्या यशानंतर, भारतीय अंतराळ संस्था सतत नवनवीन ध्येय गाठत आहे. सर्वप्रथम इस्रोने सूर्य मिशनसाठी आदित्य एल-1 लाँच केलं. आता इस्रोचा फोकस मानवी मिशन गगनयानवर आहे. या मिशनअंतर्गत एक स्पेसक्राफ्ट अंतराळात पाठवलं जाणार आहे, ते भारताच्या पहिल्या मानवी मिशनची रिहर्सल म्हणून पाठवलं जात आहे. गगनयान मिशनच्या तयारीसाठी इस्रो दीर्घकाळापासून काम करत आहे.

एका स्पेसक्राफ्टच्या माध्यमातून महिला रोबोट व्योममित्रला स्पेसमध्ये पाठवण्याची तयारी केली जात आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी बुधवारी सांगितलं की, मानवी मिशनपूर्वी महिला रोबोटिक अंतराळवीर व्योममित्रला अंतराळात लाँच करणार आहे. एका खासगी वाहिनीवरील कार्यक्रमादरम्यान केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली. ISRO चं महत्त्वाकांक्षी गगनयान मिशन ह्यूमन स्पेसफ्लाइटमध्ये भारताची क्षमता जगाला दाखवण्यासाठी सज्ज आहे.

मानवयुक्त मिशनच्या अगोदर, इस्रोने महिला रोबोट अंतराळवीर 'व्योममित्र' घेऊन जाणारे चाचणी उड्डाण पुढील वर्षासाठी नियोजित केलं आहे. अंतराळात तसेच समुद्रात भारताची ताकद वाढवण्यासाठी इस्रोने डीप सी मिशनची तयारी केली आहे, जी पुढील तीन-चार वर्षांत पूर्ण होईल. या मिशनद्वारे इस्रो खोल समुद्रातील संसाधनांचा शोध घेईल. जेणेकरुन भारताची शक्ती केवळ अंतराळातच नाही तर समुद्राच्या खोलवरही दिसून येईल.

डॉ सिंह यांनी घोषित केलं की भारताचं अंतराळ क्षेत्र वेगाने विकासाच्या मार्गावर आहे आणि म्हणाले की देशाची अंतराळ अर्थव्यवस्था, ज्याचे मूल्य सध्या $8 बिलियन इतके आहे, 2040 पर्यंत प्रभावी $40 बिलियन पोहोचण्याचा अंदाज आहे. त्यांनी स्पेस स्टार्टअप्समध्ये खासगी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी केलेल्या महत्त्वपूर्ण प्रगतीवर प्रकाश टाकला, ज्यांनी या आर्थिक वर्षात एप्रिलपासून एकत्रितपणे 1000 कोटींहून अधिक निधी उभारला आहे.

टॅग्स :isroइस्रोChandrayaan-3चंद्रयान-3