नवी दिल्ली : अवकाशात दोन उपग्रह यशस्वीरित्या जोडणारा (स्पेस डॉकिंग) भारत हा जगातील चौथा देश बनला आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाच्या बळावर भारताने हा प्रयोग गुरुवारी यशस्वी केला. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून गेल्या ३० डिसेंबर रोजी स्पेस डॉकिंग प्रयोगासाठी पीएसएलव्ही-सी६० या प्रक्षेपकाने उपग्रहांसहित अवकाशात भरारी घेतली होती.
स्पेस डॉकिंग (स्पाडेक्स) या मोहिमेसाठी अवकाशात पाठविण्यात आलेले एसडीएक्स०१ (चेसर) व एसडीएक्स०२ (टार्गेट) हे दोन उपग्रह सुमारे २२० किलो वजनाचे आहेत. स्पेस डॉकिंगचा प्रयोग इस्रोच्या आगामी मोहिमांसाठी अतिशय महत्त्वाचा होता. भारतीय अंतराळ स्थानक, चंद्रावर अंतराळवीरांना पाठविणे या गोष्टींसाठी स्पेस डॉकिंगचे तंत्र भारताला अवगत असणे आवश्यक आहे. त्याची पूर्तता या यशस्वी प्रयोगाने झाली.
कोणी केले स्पेस डॉकिंग?१. अमेरिका १६ मार्च १९६६२. सोव्हिएत रशिया ३० ऑक्टो. १९६७३. चीन २ नोव्हेंबर २०११
- भारताचे अंतराळ स्थानक तयार करण्यास व ये-जा करण्यास स्पेस डॉकिंग तंत्रज्ञान आवश्यक होते. हे तंत्रज्ञान कोणताही देश दुसऱ्या देशाला देत नाही. त्यामुळे हे तंत्रज्ञान भारताने विकसित केले.
- स्पेस डॉकिंगचा भारताला भावी अंतराळ मोहिमांमध्ये उपयोग होईल. शास्त्रज्ञांचे अभिनंदन.द्रौपदी मुर्मु, राष्ट्रपती
उपग्रहांचे डॉकिंग करण्याचा प्रयोग यशस्वी केल्याबद्दल इस्रोचे मी अभिनंदन करतो. अंतराळ मोहिमांमध्ये डॉकिंग अतिशय महत्त्वाचे आहे. नरेंद्र मोदी, पंतप्रधान