शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
6
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
7
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

‘इस्रो’ने सुरू केली पहिल्या मानवी अंतराळवारीची तयारी

By admin | Updated: May 29, 2017 04:01 IST

यशस्वी झाल्यास ज्याच्या साह्याने भारतीय भूमीवरून पहिला भारतीय अंतराळवीर अंतराळात पाठविणे शक्य होईल असा भारतीय अंतराळ

लोकमत न्यूज नेटवर्कश्रीहरीकोटा: यशस्वी झाल्यास ज्याच्या साह्याने भारतीय भूमीवरून पहिला भारतीय अंतराळवीर अंतराळात पाठविणे शक्य होईल असा भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने (इस्रो) तयार केलेला आजवरचा सर्वात शक्तिशाली अग्निबाण चाचणी उड्डाणासाठी सज्ज होत आहे.पूर्ण वाढ झालेल्या २०० आशियाई हत्तींएवढे किंवा प्रवाशांनी पूर्ण भरलेल्या जंबो जेट विमानाहून पाचपट म्हणजे ६४० टन एवढे वजन असलेले ‘जिओरिंक्रोनस सॅटेलाईट लाँच व्हिएकल मार्क-३’ (जीएसएलव्ही-एमके-३) अशा नावाचा हा अग्निबाण सतीश धवन अंतराळ तळाच्या लॉन्चपॅडवर आणून उभा करण्यात आला असून मान्सूनपूर्वीच्या असह्य उन्हाळ््यातही ‘इस्रो’चे अभियंते तो पहिल्या चाचणी उड्डाणासाठी सज्ज करीत आहेत.‘इस्रो’चे अध्यक्ष ए.एस. किरण कुमार यांनी सांगितले की, या अग्निबाणाचे लवकरच पहिले चाचणी उड्डाण करण्यात येणार आहे. अशी किमान सहा चाचणी उड्डाणे यशस्वी झाली तर पुढील दशकभरात हाच अग्निबाण वापरून भारतीय अग्निबाण वापरून भारतीय भूमीवरून भारतीय अंतराळवीरांना अंतराळात धाडणेही शक्य होऊ शकेल.सरकारने ३-४ अब्ज डॉलर एवढ्या खर्चाला मंजुरी दिली की लगेच २/३ अंतराळवीरांना घेऊन याने अंतराळात सोडण्याची योजना ‘इस्रो’ने तयार केली आहे. यात यश आले तर मानवाला अंतराळात धाडण्याची वैज्ञानिक क्षमता असलेला भारत हा रशिया, अमेरिका व चीननंतर जगातील चौथा देश ठरेल. विशेष म्हणजे भारतातून अंतराळात पाठविली जाणारी पहिली अंतराळयात्री महिला असावी, अशी ‘इस्रो’ची इच्छा आहे.मानवी अंतराळवारीखेरीज अधिक मोठे उपग्रह अंतराळात सोडण्याच्या दृष्टीनेही या प्रकारचा अग्निबाण भारताच्या दृष्टीने मोलाचा ठरेल. अशा अग्निबाणांच्या साह्याने चार टन वजनाचे उपग्रहही भूस्थिर कक्षेत नेऊन सोडणे शक्य होईल. अशा अग्निबाणास प्रत्येकी ३०० कोटी रुपये खर्च येणार असला तरी तो पुरेपुर वसूल होईल. कारण सध्या भारताला चार टन वर्गातील मोठे दळणवळण उपग्रह फ्रान्सच्या एरियान-५ अग्निबाणाने दक्षिण अमेरिकेतील कोऊरो येथून सोडावे लागतात. नवा अग्निबाण यशस्वी ठरला तर त्याने असे उपग्रह भारतातूनच कमी खर्चात सोडता येतील. शिवाय इतर देशांचे असे मोठे उपग्रह व्यापारी तत्वावर प्रक्षेपित करून अब्जावधी डॉलरच्या बाजारपेठेतही भारत आपला हिस्सा मिळवू शकेल. (वृत्तसंस्था)अशी आहेत नव्या अग्निबाणाची बलस्थानेभारताने आत्तापर्यंत विकसित केलेल्या मोठ्या अग्निबाणांमध्ये या नव्या अग्निबाणाची उंची सर्वात कमी म्हणजे ४३ मीटर आहे.असे असले तरी वजनाच्या दृष्टीने तो याआधीच्या जीएसएलव्ही एमके-२ च्या दीडपट व पीएसएलव्हीच्या दुप्पट वजनाचा आहे.या अग्निबाणाचे डिझाईन रुबाबदार असून दोन ‘एसयूव्ही’ मोटारींएवढे वजन अंतराळात घेऊन जाण्याची त्याची क्षमता असेल.याचा पहिला टप्पा आणि त्याला संलग्न असलेले ‘स्टार्ट-अप बूस्टर’ महाकाय असून त्यांचे वजन ६१० टन आहे. या पहिल्या टप्प्यात असलेली अनेक इंजिने एकाच वेळी चालू केली जाऊ शकतात.याच्या दुसऱ्या टप्प्यात भारताने पूर्णपणे देशात तयार केलेले ३० टन वजनाचे अभिनव असे ‘क्रायोजनिक इंजिन’ आहे.अशा क्रायोजनिक इंजिनची पूर्ण अग्निबाणात बसवून प्रथमच चाचणी घेण्यात येणार आहे. यात पुढे रेटा देण्यासाठी ‘प्रॉपेलंट’ म्हणून द्रवरूप आॅक्सिजन व द्रवरूप हायड्रोजनचा प्रथमच वापर करण्यात येत आहे. १५ वर्षांच्या अथक मेहनतीनंतर हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे.