शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक! इस्रोकडून जगातील सर्वात हलक्या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 08:08 IST

मायक्रोसॅट आणि कलामसॅट उपग्रहांचं प्रक्षेपण करत इस्रोनं रचला इतिहास

श्रीहरीकोटा: भारतीय अंतराळ संधोधन संस्थेनं (इस्रो) इतिहास रचला आहे. काल रात्री उशिरा आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रातून इस्रोनं जगातील सर्वात हलक्या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलं. काल रात्री 11 वाजून 37 मिनिटांनी इस्रोनं मायक्रोसॅट-आर आणि कलामसॅटचं प्रक्षेपण केलं. मायक्रोसॅट उपग्रहामुळे लष्कराला मोठी मदत मिळणार आहे. तर कलामसॅट हा उपग्रह विद्यार्थ्यांनी तयार केला आहे. पीएसएलव्ही-सी44 च्या मदतीनं या दोन्ही उपग्रहांचं प्रक्षेपण करण्यात आलं. मायक्रोसॅट आणि कलामसॅटच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रोचं अभिनंदन केलं. 'पीएसएलव्हीच्या आणखी एका यशस्वी प्रक्षेपणाबद्दल वैज्ञानिकांचं अभिनंदन. या प्रक्षेपणामुळे भारताच्या प्रतिभावंत विद्यार्थ्यांनी निर्माण केलेल्या कलामसॅटनं कक्षेत प्रवेश केला आहे,' अशा शब्दांमध्ये पंतप्रधानांनी इस्रो आणि विद्यार्थ्यांचं कौतुक केलं. पंतप्रधानांसोबतच इस्रोच्या प्रमुखांनीही वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासणाऱ्या विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव केला. इस्रो देशातल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. तुमचे उपग्रह आमच्याकडे घेऊन या. आम्ही त्यांचं प्रक्षेपण करू, अशा शब्दांमध्ये इस्रो प्रमुख के. सिवन यांनी विज्ञानवाद जोपासणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर आवाहन केलं.  इस्रोनं 2019 मधलं पहिली मोहीम यशस्वी केली आहे. पीएसएलव्ही प्रक्षेपकाच्या मदतीनं करण्यात आलेलं हे इस्रोचं 46वं प्रक्षेपण आहे. इस्रोनं प्रक्षेपित केलेला कलामसॅट उपग्रह अनेकार्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याचं वजन केवळ 1.26 किलोग्राम इतकं आहे. विशेष म्हणजे अवघ्या सहा दिवसांमध्ये या उपग्रहाची निर्मिती करण्यात आली. चेन्नईतल्या स्पेस किड्स इंडिया या स्टार्टअप कंपनीनं कलामसॅटची निर्मिती केली आहे. 

टॅग्स :isroइस्रो