शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

आता सर्जिकल स्ट्राईक आणखी अचूक होणार; आकाशातून शत्रूच्या हातातलं घड्याळही दिसणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 17:06 IST

इस्रोकडून लवकरच नव्या उपग्रहाचं प्रक्षेपण

नवी दिल्ली: चंद्रयान-२ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर आता इस्रोनं नव्या मोहिमेची तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे इस्रोच्या नव्या मोहिमेमुळे देशाची संरक्षण सज्जता आणखी वाढेल. यंदाच्या वर्षात इस्रो कार्टोसॅट-३ उपग्रह  सोडेल. संरक्षणाच्या दृष्टीनं कार्टोसॅट-३ महत्त्वाची भूमिका बजावेल. इस्रोमधील विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबरच्या अखेरीस किंवा ऑक्टोबरमध्ये कार्टोसॅट-३ अवकाशात झेपावेल. अवकाशातून भारतीय जमिनीवर लक्ष ठेवण्याच्या उद्देशानं कार्टोसॅट-३ चं प्रक्षेपण करण्यात येईल. नैसर्गिक आपत्तीची सूचना देण्याचं, विकासकामांना सहाय्य करण्याचं काम हा उपग्रह करेल. यासोबतच देशाच्या सीमांवर नजर ठेवण्याची जबाबदारीदेखील कार्टोसॅट-३ पार पाडेल. या उपग्रहाच्या माध्यमातून पाकिस्तान आणि तिथल्या दहशतवादी तळांवर नजर ठेवणं सोपं होणार आहे. पाकिस्तानच्या जमिनीवरील अगदी बारीकसारीक हालचाली टिपण्याची क्षमता कार्टोसॅट-३ मध्ये असेल. याचा मोठा फायदा भारतीय सैन्याला होईल. कार्टोसॅट-३ हा कार्टोसॅट मालिकेतील नववा उपग्रह आहे. या उपग्रहातील कॅमेरा अतिशय शक्तीशाली असेल. जमिनीवर असलेल्या माणसाच्या मनगटावरील घड्याळातील वेळ दाखवू शकेल, इतकी क्षमता कार्टोसॅट-३ मधील कॅमेऱ्यात असेल. फेब्रुवारीमध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइकमध्ये कार्टोसॅट उपग्रहांची मदत घेण्यात आली होती. विविध वातावरणात पृथ्वीची छायाचित्र घेण्याची क्षमता कार्टोसॅट-३ मध्ये आहे. याशिवाय नैसर्गिक आपत्तींची पूर्वसूचना  देण्याचं कामदेखील हा उपग्रह करेल. 

टॅग्स :surgical strikeसर्जिकल स्ट्राइकisroइस्रोPakistanपाकिस्तानterroristदहशतवादी