भारतानेइस्रोच्या माध्यमाने 2015 ते 2024 या कालावधीत परदेशी सॅटेलाइट लॉन्च करून तब्बल 143 मिलियन अमेरिकन डॉलर (12 अब्ज भारतीय रुपयांपेक्षाही अधिक) परदेशी चलन मिळवले आहे. ही माहिती केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसबेत दिली. जितेंद्र सिंह हे अंतराळ क्षेत्राचे प्रभारी आहेत. इस्रोने गेल्या दहा वर्षांत अर्थात जानेवारी 2015 ते डिसेंबर 2024 या कालावधीत आपल्या पीएसएलव्ही, एलव्हीएम3 आणि एसएसएलव्ही रॉकेटच्या माध्यमाने 393 परदेशी, तर 3 भारतीय ग्राहकांचे सॅटेलाइट लॉन्च केले आहेत.
या देशांचे सॅटेलाइट केले लॉन्च -जितेंद्र सिंह म्हणाले, भारताने आतापर्यंत 34 देशांचे सॅटेलाईट लॉन्च केले आहेत. यात अमेरिकेचे 232, इंग्लंडचे 83, सिंगापूरचे 19, कॅनडाचे 8, दक्षिण कोरियाचे 5, लक्समबर्ग आणि इटलीचे प्रत्येकी 4-4, जर्मनी, फ्रान्स, बेल्जियम आणि फिनलँडचे प्रत्येकी 3-3 सॅटेलाइट्सचा समावेश आहे. याशिवाय, भारताने जपान, इस्रायल, स्पेन, ऑस्ट्रेलिया, संयुक्त अरब अमीरात आणि ऑस्ट्रिया यांचेही सॅटेलाइट लॉन्च केले आहेत.
2023 मध्ये 2 महापराक्रम - आज भारत हा एक मोठी अंतराळ शक्ती बणून समोर आला आहे. भारताने २०२3 मध्ये दोन महापराक्रम केले. पहिला म्हणजे, चांद्रयान-3 चे चंद्राच्या दक्षिण भागात यशस्वीपणे सॉफ्ट लँडिंग आणि दुसरे म्हणजे, आदित्य-एल-1 हे भारताचे पहिले सौर मिशन बनले, जे सध्या सूर्याचा अभ्यास करत आहे. याशिवाय भारत गगनयानची तयारीही करत आहे.
2035 पर्यंत स्वतःचे अंतराळ स्थानक -भविष्यातील प्लॅनिंगचा विचार करता, 2035 पर्यंत स्वतःचे 'भारतीय अंतराळ स्थानक' तयार करण्याचे आणि 240 पर्यंत पहिली भारतीय व्यक्ती चंद्रावर पाठवण्याचे टार्गेट आहे.