शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Chandrayaan 2: इस्रोच्या शास्त्रज्ञांची उद्या कठीण परीक्षा; एक तास धडधड वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2019 20:38 IST

भारतीय अवकाश संशोधन संस्थे(ISRO)चं चांद्रयान 2 उद्या चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणार आहे.

नवी दिल्लीः भारतीय अवकाश संशोधन संस्थे(ISRO)चं चांद्रयान 2 उद्या चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणार आहे. सकाळी 8.30 ते 9.30दरम्यान चांद्रयान-2ला विशेष दिव्यातून जावं लागणार आहे. त्यासाठी इस्रोनं पूर्ण तयारी केलेली आहे. 7 सप्टेंबरला चांद्रयान-2 दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. चांद्रयान 2ला 22 जुलै रोजी श्रीहरिकोटा येथून बाहुबली या रॉकेटच्या सहाय्यानं प्रक्षेपित करण्यात आलं होतं. तत्पूर्वी 14 ऑगस्ट रोजी चांद्रयान 2ला चंद्राच्या कक्षेच्या दिशेनं सोडण्यात आलं, त्यामुळेच चांद्रयान-2 हळूहळू चंद्राच्या जवळ पोहोचतोय. चांद्रयान 2ची तंदुरुस्ती आणि त्याच्या मार्गाची निगराणी इस्रोचे तीन सेंटर्स करत आहेत. मिशन ऑपरेशन कॉम्प्लेक्स (MOX), इस्रो टेलिमेट्री ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क (ISTRAC) आणि इंडियन डीप स्पेस नेटवर्क (IDSN) यांचा यात समावेश आहे.इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सिवन म्हणाले, चांद्रयान 2ला चंद्राच्या कक्षेत प्रवेश करताना कठोर आव्हानांना तोंड द्यावं लागणार आहे. चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती 65000 किमीपर्यंत राहते. अशातच चांद्रयान 2ची गती कमी करावी लागणार आहे. अन्यथा चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या प्रभावात येऊन चांद्रयान 2 इतर ठिकाणीही धडकू शकते. चांद्रयान 2ची गती कमी करण्यासाठी ऑनबोर्ड प्रोपल्‍शन सिस्‍टम थोड्या वेळासाठी चालू करावं लागणार आहे. यादरम्यान एक छोटीशी चूकही महागात पडू शकते. ही फक्त चांद्रयान 2चीच परीक्षा नव्हे, तर इस्रोच्या शास्त्रज्ञांसाठीही कठोर आव्हान आहे.चांद्रयान 2नं चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर 31 ऑगस्टपर्यंत चंद्राच्या चहूबाजूंनी हे यान फिरत राहणार आहे. चांद्रयान 2ला चंद्राच्या सर्वात जवळच्या कक्षेपर्यंत नेण्यासाठी चार वेळा त्याची कक्षा बदलावी लागणार आहे. चंद्राच्या भूमीचा अभ्यास करण्यासाठी विविध यंत्रणा या यानावर बसवण्यात आली आहे. मोहिमेतील सर्व यंत्रणा या भारतीय बनावटीच्या आहेत. या मोहिमेंतर्गत चंद्रावर सॉफ्ट लँडिंगद्वारे रोव्हर वॉक होणार होते.

टॅग्स :Chandrayaan 2चांद्रयान-2