शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

Priyanka Gandhi : "आपल्या डोळ्यासमोर त्यांची हत्या केली जातेय, कुठे गेली आपली माणुसकी?; भारताने..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2023 13:30 IST

Priyanka Gandhi And Israel Hamas War : गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धावर प्रियंका गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जे योग्य आहे त्याच्या पाठीशी उभं राहणं हे भारताचे कर्तव्य आहे, असं त्या म्हणाल्या.

इस्रायल-हमासमध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून युद्ध सुरू आहे. याच दरम्यान हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला. तसेच अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धावर प्रियंका गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जे योग्य आहे त्याच्या पाठीशी उभं राहणं हे भारताचे कर्तव्य आहे, असं त्या म्हणाल्या. यासोबतच युद्धबंदीसाठी शक्य ते सर्व प्रयत्न करा असंही सांगितलं. 

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "भारत नेहमीच योग्य गोष्टींचं समर्थन करत आला आहे. आपल्या देशाने स्वातंत्र्यासाठी पॅलेस्टिनी जनतेचं नेहमीच समर्थन केलं आहे. गाझामध्ये अजूनही बॉम्बफेक सुरू आहे. अन्नधान्याचा मोठा तुटवडा झाला. वैद्यकीय सुविधा नष्ट केल्या गेल्या आणि सर्व आवश्यक वस्तूंचा पुरवठाही खंडित झाला आहे. संपूर्ण देश उद्ध्वस्त होत आहे."

"युद्धात 16,000 निष्पाप नागरिक मारले गेले आहेत, ज्यात 10,000 मुले, 60 पत्रकार आणि शेकडो वैद्यकीय कर्मचारी आहेत. हे आमच्यासारखे स्वप्न आणि अपेक्षा असलेले लोक आहेत. आपल्या डोळ्यासमोर त्यांची हत्या केली जात आहे. कुठे गेली आपली माणुसकी? आम्ही आमच्या पॅलेस्टिनी बंधू-भगिनींना त्यांच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात दीर्घकाळ समर्थन देत आहोत, पण आता आम्ही मागे आलो आहोत आणि त्यांच्यासाठी काहीही करत नाही."

"आंतरराष्ट्रीय समुदायाचा एक भाग असल्याने, जे योग्य आहे त्यासाठी उभे राहणे ही भारताची जबाबदारी आहे. शक्य तितक्या लवकर युद्धविराम सुनिश्चित करण्यासाठी आपण सर्व शक्य प्रयत्न केले पाहिजेत" असं प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायल-हमास संघर्षामुळे गाझामधील मृतांची संख्या 16,200 च्या पुढे गेली आहे. आणि सुमारे 42,000 जखमी आहेत. 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्यानंतर इस्रायलने गाझामध्ये मोठ्या प्रमाणावर लष्करी कारवाई सुरू केली आहे. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्ध