शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
3
TATA Stock Listing: आधी डिमर्जर, मग नाव बदललं, आता टाटांच्या 'या' कंपनीची शेअर बाजारात होणार एन्ट्री; उद्या लिस्टिंग
4
१८ वर्षांनंतर निठारी हत्याकांडात मोठा निर्णय; एका प्रकरणातही कोली दोषी नाही, कोर्टाकडून फाशीची शिक्षा रद्द
5
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
6
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
7
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
8
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
9
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
10
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
11
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
12
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
13
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
14
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
15
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
16
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
17
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
18
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
19
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
20
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम

देशात इस्लामिक बँकिंग सेवेला परवानगी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 02:19 IST

देशात इस्लामिक बँकिंग व्यवस्थेला परवानगी न देण्याचा  निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने माहितीच्या  अधिकारात केलेल्या अर्जाला रिझर्व्ह बँकेने दिलेल्या उत्तरात म्हटले आहे  की, देशातील सगळ्य़ा नागरिकांना बँकिंग आणि आर्थिक सेवा सारख्याच  पद्धतीने व व्यापक प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे परवानगी न देण्याचा  निर्णय  घेण्यात आला आहे. 

ठळक मुद्देरिझर्व्ह बँकेचा निर्णयआरटीआयला उत्तर

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशात इस्लामिक बँकिंग व्यवस्थेला परवानगी न देण्याचा  निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने माहितीच्या  अधिकारात केलेल्या अर्जाला रिझर्व्ह बँकेने दिलेल्या उत्तरात म्हटले आहे  की, देशातील सगळ्य़ा नागरिकांना बँकिंग आणि आर्थिक सेवा सारख्याच  पद्धतीने व व्यापक प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे परवानगी न देण्याचा  निर्णय  घेण्यात आला आहे. इस्लामिक किंवा शरीया बँकिंग व्यवस्था व्याज न आकारण्याच्या तत्त्वावर  चालणारी अर्थव्यवस्था आहे. व्याज घेणे इस्लाममध्ये निषिद्ध मानण्यात  आले आहे. भारतात इस्लामिक बँकिंग सेवा देण्याच्या प्रस्तावाचा अभ्यास  रिझर्व्ह बँकेने आणि भारत सरकारने केला. भारतात व्याजविरहित बँकिंग  किंवा इस्लामिक बँकिंग सेवा सुरू करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने काय पावले  उचलली, याचा तपशील विचारण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ ऑगस्ट, २0१४ रोजी जन धन योजना सुरू  केली. देशातील सगळ्य़ांना आर्थिक व्यवहारांत सामावून घेण्याच्या उद्देशाने  ही योजना होती. २00८मध्ये आर्थिक क्षेत्र सुधारणांसाठी समितीने  व्याजविरहित बँकिंग सेवा सुरू करण्याचा बारकाईने विचार करण्यावर भर  दिला होता. रिझर्व्ह बँकेचे तत्कालीन गव्हर्नर रघुराम राजन हे या समितीचे  प्रमुख होते. काही धर्मांतील लोक हे व्याज देणारी आर्थिक साधने निषिद्ध  मानतात.

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकIslamइस्लामbankबँक