शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

काश्मिरात इसिसचा ध्वज; लष्कर सतर्क

By admin | Updated: October 10, 2014 03:26 IST

काश्मिरात रॅलीच्या वेळी जवानांवर झालेली दगडफेक आणि इस्लामिक स्टेटचा (आयएस) ध्वज दिसण्याची घटना लष्कराने गांभीर्याने घेतली असून तेथील परिस्थितीवर बारीक नजर ठेवली जात आहे.

श्रीनगर : काश्मिरात रॅलीच्या वेळी जवानांवर झालेली दगडफेक आणि इस्लामिक स्टेटचा (आयएस) ध्वज दिसण्याची घटना लष्कराने गांभीर्याने घेतली असून तेथील परिस्थितीवर बारीक नजर ठेवली जात आहे. आयएसचा ध्वज आढळून येणे ही सर्व सुरक्षा संस्थांसाठी गंभीर चिंतेची बाब असल्याचे लष्कराच्या १५ व्या कॉर्प्सचे जनरल आॅफिसर कमांडिंग (जीओसी) लेफ्ट. जन. सुब्रता साहा यांनी स्पष्ट केले.काश्मिरात सुरक्षा यंत्रणेची चिंता वाढवणाऱ्या काही घटना घडल्या आहेत. लष्कराच्या जवानांवर दगडफेक होणे आणि आयएसचा ध्वज आढळणे या बाबींबाबत माहिती मागितली असून परिस्थितीवर नजर ठेवली जात असल्याचे त्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)गेल्या महिन्यात काश्मीरमध्ये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सेवेत असलेल्या हेलिकॉप्टर्सवर लोकांनी दगडफेक केली होती. लोकांमध्ये असलेली संतापाची भावना त्यामागे होती. अशा घटना अपवादात्मक ठरतात. लोक पुरामुळे चिंतित होते. पैसा,औषध, मुलांचे शिक्षण आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न या सर्वांमुळे काश्मिरी लोकांमध्ये अनिश्तिततेचे वातावरण होते. अशा परिस्थितीत अशा घटनांवर अतिशय दक्षपणे नियंत्रण मिळविले जाते. या घटना अपवादात्मक होत्या आणि परिस्थितीनुसार आम्ही निर्णय घेतला आहे, असे त्यांनी सांगितले. पूरग्रस्तांच्या मदतकार्यात अतिरेक्यांची मदत नाहीदक्षिण काश्मिरात पुराच्या वेळी अतिरेक्यांनी मदतकार्यात सहभाग घेतल्याचे वृत्त ले. जन. साहा यांनी फेटाळले. ‘सैलाबसे सलामती’ असे या परिस्थितीला संबोधू या. पर्यटन आणि निवडणुकीसाठी परिस्थिती पूर्ववत होणे महत्त्वाचे आहे. काही भागात लोकांची घरे नव्याने बांधावी लागणार असून त्या लोकांना मदतीची गरज आहे. हिवाळा जवळ येत असल्यामुळे आम्हाला सज्ज राहावे लागेल. युवकांची सकारात्मक मदत घेतली जात आहे. काश्मिरात पर्यटन महत्त्वाचे आहे, कारण त्याचा संबंध लोकांच्या उदरनिर्वाहाशी येतो. आम्ही जनतेच्या सहभागातून तेथे काम करीत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.