शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

मुंबई हल्ल्यासाठी ISIने आर्थिक मदत दिली - हेडली

By admin | Updated: February 9, 2016 12:52 IST

मुंबईवरील हल्ल्यासाठी पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयने 'लष्कर ए-तोयबा' आर्थिक तसेच लष्करी मदत पुरवल्याचा महत्वपूर्ण खुलासा डेव्हिड हेडलीने केला.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ -  मुंबईवरील हल्ल्यासाठी पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयने 'लष्कर ए-तोयबा' आर्थिक तसेच लष्करी मदत पुरवल्याचा महत्वपूर्ण खुलासा डेव्हिड हेडलीने केला. या हल्ल्याच्या कटात सहभागी असलेल्या हेडलीने मंगळवारी, सलग दुस-या दिवशीही मुंबईच्या विशेष न्यायालयासमोर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष दिली. त्याच्या साक्षीवरुन मुंबईवर २६/११ दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचा सहभाग स्पष्ट झाला आहे.
मुंबईवरील हल्ल्यासाठी आयएसआयने लष्कर-ए-तयब्बाला नैतिक, लष्करी आणि आर्थिक रसद पुरवल्याचा महत्वपूर्ण खुलासा हेडलीने केला. मी आयएसआयसाठी काम करत होतो. त्या दरम्यान मी पाकिस्तानी लष्कराच्या अनेक अधिका-यांना भेटल्याचेही हेडलीने सांगितले.
'लष्कर-ए-तोयबा'ने २००७ सालीच मुंबईवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला होता, २००७ सालच्या नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये साजिद मीर साजिद, अबु खफा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मला मुंबईतील ताजमहल हॉटेलची रेकी करण्याचे टार्गेट देण्यात आले अशी माहिती डेव्हिड हेडलीने दिली. अमेरिकेतील तुरूंगात शिक्षा भोगणा-या हेडलीची सलग दुस-या दिवशी, मंगळवारीही साक्ष सुरू असून त्याला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुंबई न्यायालयासमोर हजर करण्यात आले. आजचया साक्षीदरम्यमानही त्याने अनेक महत्वपूर्ण खुलासे केले.
'लष्कर'चा नेता नेता अब्दुल रेहमान पाशा याच्याशी माझी २००३ साली पहिल्यांदा भेट झाली. त्यानंतर लाहोरपासून सुमारे ३०० किमी अंतरावर मी 'जैश-ए-मोहम्मद'चा म्होरक्या मौलाना मसूद अजहरला भेटलो. 'लष्कर-ए-तोयबा' या दहशतवादी संघटनेशी माझे संबंध असून मी दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलो आहे, अशी तक्रार माझी पत्नी फैजा हिने इस्लामाबादमधील अमेरिकी दूतावासात २००८ साली केली होती' अशी माहिती हेडलीने दिली. पाकिस्तानी गुप्तहेर संघटना 'आयएसआय'साठी हेरगिरी करण्यासाठी काही माणसे भारतीय सैन्यात भरती करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली होती, असेही त्याने सांगितले.
दरम्यान काल सुनावणीच्या पहिल्या दिवीश हेडलीने मुंबई हल्ल्यामागे पाकिस्तानचाच हात असल्याचे स्पष्ट करत २६/११ पूर्वी लष्करने सप्टेंबर व ऑक्टोबर २००८मध्ये दोनदा हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती दिली होती.
लष्कर-ए-तोयबा ही दहशतवादी संघटना आहे. या संघटनेचा मूळ उद्देश भारताच्या लष्कराशी लढणे आणि काश्मिरींना मदत करणे, हा आहे. भारतामध्ये झालेल्या सर्व दहशतवादी कारवायांमागे एलईटीचा हात आहे, असेही हेडलीने स्पष्टपणे सांगितले. त्याच्या या साक्षीने पाकिस्तानच्या साऱ्या दहशतवादी कारवाया जगासमोर येण्यास मदत होणार आहे.
 
हेडलीच्या साक्षीतील महत्वाचे मुद्दे :
- पाकिस्तानी गुप्तचर संघटना ISI साठी हेरगिरी करण्यासाठी भारतीय लष्करात माणसे भरती करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली होती.
- लष्कर -ए-तोयबा वर अमेरिकेने घातलेल्या बंदीला कायदेशीर आव्हान देण्याचा सल्ला मी हाफीज सईद व झकी-उर-रेहमान-लख्वी यांना दिला होता.
- हाफिज सईद व लख्वी यांच्या उपस्थितीत मी इतर १०२ लोकांसोबत दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण घेतले.
- २००७ साली 'लष्कर'ने मुंबईवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला. २००७ सालच्या नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये साजिद मीर साजिद, अबु खफा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मला मुंबईतील ताजमहाल हॉटेलची रेकी करण्याचे टार्गेट देण्यात आले होते. 
- झकी-उर-रेहमान-लख्वी हा 'लष्कर-ए-तोयबाचा' ऑपरेशनल कमांडर होता. मी त्याला २००३ साली पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबादमध्ये भेटलो होतो.
- लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मुहम्मद आणि हिज्ब-उल-मुजाहिद्दीन या सर्व दहशतवादी संघटना 'युनायटेड जिहाद काउन्सिल' अंतर्गत भारताविरोधात काम करतात.
- ऑक्टोबर २००३ मध्ये मी जैश-ए-मुहम्मदचा म्होरक्या मसूद अझरला भेटलो. लष्कर-ए-तोयबाच्या एका कार्यक्रमात तो (मसूद अझर) पाहुणा म्हणून उपस्थित होता आणि त्यावेळी त्याने त्याची झालेली सुटका व भारतातील कारवायांबद्दल माहिती दिली.
-  लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी माझे संबंध असून मी दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलो आहे, अशी तक्रार माझी पत्नी फैजा हिने इस्लामाबादमधील अमेरिकी दूतावासात २००८ साली केली होती.
- १४ सप्टेंबर २००६ साली मी कराचीहून पहिल्यांदा भारतात, मुंबईत आलो होतो.
- २००७च्या आधी मी ताज हॉटेलचे फोटो काढले, व्हिडीओ चित्रीकरणही केलं. पण या हॉटेलला लक्ष्य करण्यात येईल असं मला वाटलं नव्हतं.