इशरत जहांप्रकरणी अमीन यांची याचिका रद्दबातल
By admin | Updated: January 15, 2015 22:32 IST
नवी दिल्ली : २००४ साली झालेल्या इशरत जहां चकमकीतील आरोपी गुजरात कॅडरचे पोलीस अधिकारी एन.के. अमीन यांची जामीन याचिका सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविली आहे.
इशरत जहांप्रकरणी अमीन यांची याचिका रद्दबातल
नवी दिल्ली : २००४ साली झालेल्या इशरत जहां चकमकीतील आरोपी गुजरात कॅडरचे पोलीस अधिकारी एन.के. अमीन यांची जामीन याचिका सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविली आहे. न्या. व्ही. गोपालगौडा व न्या. सी. जगप्पन यांच्या खंडपीठाने या अपिलात काही तथ्य नसल्याचे म्हटले आहे. अमीनने सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर इशरत जहां चकमकीच्या प्रकरणात जामीन नामंजूर केल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले होते.