शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

IRCTC User Data: IRCTC चा मोठा निर्णय; प्रवाशांचा डेटा विकणार, 1000 कोटी रुपये जमवण्याची योजना...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 12:48 IST

Irctc User Data: ट्रेनचे तिकीट बूक करण्यासाठी अनेकजण IRCTCचा वापर करतात. IRCTCकडे रेल्वे प्रवाशांचा सर्व खाजगी डेटा आहे.

IRCTC User Data: ट्रेनचे तिकीट बूक करण्यासाठी आपल्यापैकी अनेकजण IRCTC अॅप किंवा वेबसाइटचा वापर करतो. IRCTC कडे रेल्वे प्रवाशांचा सर्व डेटा  आहे, हे आपल्याला माहिती आहे. आता IRCTC ने प्रवाशांच्या डेटाबाबत अतिशय धक्कादायक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे तुमच्या पायाखालची जमीन सरकू शकते. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच IRCTC आपले उत्पन्न वाढवण्यासाठी प्रवाशांचा डेटा विकण्याचा विचार करत आहे.

प्रवाशांच्या विश्वासाला तडा...

IRCTCने हा डेटा विकण्यासाठी टेंडरही जारी केले आहे, म्हणजेच आता IRCTC डेटा कमाईवर काम करणार आहे. हा डेटा आयआरसीटीसीच्या साइटवर असून, या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये संताप आणि विरोध होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. IRCTCकडे प्रवाशांची वैयक्तिक माहिती जसे की मोबाईल क्रमांक, बँक खात्याची माहिती आहे. प्रवासी आपली वैयक्तिक माहिती विश्वासाच्या आधारावर साइटवर अपलोड करत असतो, पण आता IRCTC च्या या निर्णयामुळे प्रवाशांच्या विश्वासाला तडा जाणार आहे. 

कोणती माहिती सार्वजनिक होणार?भारतीय रेल्वेने प्रवास करणारे बहुतेक प्रवासी त्यांची रेल्वे तिकिटे IRCTC द्वारे बुक करतात, म्हणजेच कंपनीकडे डेटा बेस खूप मोठा आहे. यामुळेच आता त्यावर कमाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकरणात, सूत्रांचे म्हणणे आहे की डेटातून निश्चितपणे कमाई केली जात आहे, परंतु प्रवाशांच्या बँकेच्या व्यवहाराशी संबंधित कोणतेही तपशील शेअर केले जाणार नाहीत. एवढेच नाही तर पॅन कार्ड, आधार कार्ड, डेबिट किंवा क्रेडिट कार्डशी संबंधित कोणतीही माहिती कोणाशीही शेअर केली जाणार नाही. ट्रॅव्हल पॅटर्न, हिस्ट्री आणि लोकेशनशी संबंधित डेटामध्ये कंपन्या स्वारस्य दाखवू शकतात, असे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :IRCTCआयआरसीटीसीIndian Railwayभारतीय रेल्वे