शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान अखेर जिंकला, पण संथ खेळीमुळे खड्ड्यात राहिला; १४ षटकांत जिंकायचं होतं, पण... 
2
महायुती सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा; काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी
3
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा मुलगा हंटर बायडेन दोषी, फेडरल गन प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय
4
शाकाहरीबाबत तुमचं मत काय? जैन मुनींच्या प्रश्नावर शरद पवारांचं एका वाक्यात उत्तर
5
PM Narendra Modi : सोशल मीडियावरून 'मोदी का परिवार' आता हटवा; पंतप्रधान नरेंद्र मोदींची विनंती
6
भाजपचे धक्कातंत्र! पुन्हा नवीन चेहऱ्याला संधी, मोहन माझी यांना ओडिशाचे मुख्यमंत्रिपद दिले
7
स्पर्धेबाहेर होण्याच्या भितीने पाकिस्तानची कामगिरी सुधारली; जॉन्सनच्या तडाख्याने हुडहुडी भरली
8
Fact Check: मोदींविरोधात घोषणा देणारी महिला कंगनाला मारणाऱ्या CISFची आई नाही!
9
Vande Bharat मध्ये शिरले शेकडो विना तिकीट प्रवासी; video व्हायरल होताच नेटकरी भडकले...
10
युवराज सिंगकडून पाकिस्तानच्या पराभवानंतर शाहिद आफ्रिदीचं सांत्वन, भन्नाट Video 
11
एक हिरो, एक हिरोईन अन् रहस्यमय मर्डर; तपासात सत्य बाहेर येताच पोलीसही हैराण
12
MMS लीक होताच खचली! निवडणुकीमुळे पुन्हा चर्चेत आली; भोजपुरी क्वीनचा बोल्ड अंदाज
13
Aadhar Card : तुमच्या आधार कार्डचा कुठे-कुठे वापर झाला; सोप्या पद्धतीने हिस्ट्री तपासा
14
वाफाळलेल्या चहासोबत गरमागरम भजी आणि बिस्किट खाताय?; 'हे' फूड कॉम्बिनेशन हानिकारक
15
"पाकिस्ताननं आता पुरूष संघांविरूद्ध खेळू नये कारण...", माजी खेळाडूची बोचरी टीका!
16
अजित पवारांच्या NCP चा नेता 'शिवतीर्थ'वर; राज ठाकरेंसोबत केली चर्चा, नेमकं काय घडतंय?
17
कुठे गायब आहे 'जुम्मा-चुम्मा' गर्ल?, ३२ वर्षांपासून आहे कलाविश्वापासून दूर
18
जेलमधून घरी पोहचला युवक, दरवाजा उघडताच पायाखालची जमीन सरकली; नेमकं काय घडलं?
19
२४ वर्षापासून वर्क फ्रॉम होम करायचे मुख्यमंत्री; आता नव्या CM साठी बंगल्याची शोधाशोध
20
Mallikarjun Kharge : "दुसऱ्यांच्या घरातून खुर्च्या उधार घेऊन..."; मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

विमानाप्रमाणे ट्रेनमध्ये जेवणासाठी मोजावे लागणार पैसे, प्रवासादरम्यान या गोष्टी करणे बंधनकारक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 11:30 AM

थर्ड एसीत ५२, सेकंडमध्ये ४८ प्रवासी असतील. आरोग्य सेतू अॅप आवश्यक. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रवाशांना इच्छितस्थळी पोहोचल्यावर १४ दिवस क्वॉरंटाइन व्हावे लागेल.

५१ दिवसांनंतर प्रवासी रेल्वे धावण्यासाठी सज्ज आहेत.  १२ मेपासून विशेष रेल्वेसेवा सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांना एअरलाइन्ससारखे जेवण मिळणार आहे. यासाठी आयआरसीटीसीने त्यांची नियमावली तयार केली आहे. कोरोना विषाणूचा धोका उद्भवू नये म्हणून रेल्वेने प्रवाशांना घरातून अन्न आणि पाणी आणण्याचा सल्ला दिला आहे. प्रवाशांना ट्रेनमध्ये काहीतरी वेगळे खायचे असेल तर त्यांना त्यासाठी पैसे द्यावे लागतील. विमानात ज्याप्रकारे खाण्यासाठी पैसे मोजावे लागतात अगदी त्याचप्रकारे ट्रेनमध्येही खाण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत.

विशेष ट्रेनमधील प्रवासादरम्यान आयआरसीटीसीच्या वतीने ई-कॅटरिंगद्वारे जेवण दिले जाईल. त्याचे शुल्क प्रवाशाच्या तिकिटामध्ये जोडले जाणार नसून स्वतंत्रपणे पैसे द्यावे लागतील. प्रवाशांना पाण्याची बाटलीसुद्धा स्वखर्चानेच घ्यावी लागेल. कोणत्याही प्रकारची सोयीसाठी प्रवाशांनी भारतीय रेल्वेवर अवलंबून राहू नये. त्यासाठी  "प्रवाशांना स्वत:च्या चादरी, खाण्याचे पदार्थ आणि पाण्याच्या बॉटल आणणे गरजेचे असणार आहे. भारतीय रेल्वे कोणत्याही प्रकारची जबाबदारी उचलणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. 

रेल्वे सुटण्याच्या दीड तास आधी स्टेशनवर यावे लागेल. थर्मल स्क्रीनिंगनंतर लक्षणे नसणाऱ्या प्रवाशांनाच पाठवले जाईल. रेल्वे सुटण्याच्या १५ मिनिटे आधी प्रवेश मिळेल. स्टेशन आणि रेल्वेत मास्क अनिवार्य राहील. थर्ड एसीत ५२, सेकंडमध्ये ४८ प्रवासी असतील. आरोग्य सेतू अॅप आवश्यक. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रवाशांना इच्छितस्थळी पोहोचल्यावर १४ दिवस क्वॉरंटाइन व्हावे लागेल.

रेल्वेने प्रत्येक डब्यात स्वच्छतेसाठी विशेष व्यवस्था केली आहे. तसेच ट्रेनमध्ये प्रवेश आणि उतरताना प्रवाशांना हात स्वच्छ करणे बंधनकारक आहे. त्यासाठी वेळोवेळी सॅनिटाईज करण्याचे नियम आहे. आजपासून 12 मे रोजी विशेष गाड्या रुळावर धावण्यास सुरू होणार आहेत. रेल्वेनं निवडलेल्या मार्गांवर रेल्वेच्या 15 गाड्या धावण्यासाठी सज्ज आहेत. या गाड्यांमध्ये फक्त एसी कोच असतील.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या