शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

शाब्बास पोरी! आईने मजुरी करून शिकवलं, लेकीने पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश मिळवलं, झाली IPS

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2022 20:24 IST

दिव्याचे घर खूप छोटे आहे पण तिने तिथे राहून तयारी केली. परीक्षेसाठी तिने कोणत्याही कोचिंगची मदत घेतली नाही आणि स्वत: केलेल्या अभ्यासाच्या मदतीने आपले ध्येय साध्य केले.

UPSC परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवार दिवसरात्र मेहनत करत असतात, पण त्यात किती जण यशस्वी होतात हे तुम्हाला माहीत असेलच. अशीच एक प्रेरणादायी घटना आता समोर आली आहे. आईने मजुरी करून शिकवलं आणि लेकीने पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश मिळवलं आहे. लेक IPS झाली आहे. 

हरियाणातील महेंद्रगड येथील दिव्या तनवर तिच्या भावंडांमध्ये सर्वात मोठी असून ती तिची आई आणि दोन लहान भावंडांसोबत राहते. ती अत्यंत साध्या कुटुंबातून आली असून UPSC परीक्षेत तिचा हा पहिलाच प्रयत्न होता. पहिल्याच प्रयत्नात दिव्या IPS झाली आहे. दिव्या खूप लहान होती जेव्हा तिचे वडील गेले, त्यानंतर तिच्या आईने इतरांच्या शेतात मजूर म्हणून काम केले आणि मुलांना शिकवलं.

दिव्याने तिचे प्राथमिक शिक्षण निंबी जिल्ह्यातील मनू स्कूलमधून केले आणि नंतर ती परीक्षा उत्तीर्ण होऊन नवोदय विद्यालयात दाखल झाली. तिने सरकारी पीजी कॉलेजमधून बीएस्सी पदवी पूर्ण केली आहे. दिव्या मुलांनाही शिकवायची. परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी नशिबापेक्षा मेहनत महत्त्वाची असते, असं ती मानते. जर एखाद्याने ठरवले असेल की त्याला ते करायचे आहे, तर तो कठोर परिश्रमाच्या जोरावर ते साध्य करू शकतो.

दररोज 10 तास अभ्यास

दिव्याचे घर खूप छोटे आहे पण तिने तिथे राहून तयारी केली. परीक्षेसाठी तिने कोणत्याही कोचिंगची मदत घेतली नाही आणि स्वत: केलेल्या अभ्यासाच्या मदतीने आपले ध्येय साध्य केले. ती दिवसातून 10 तास अभ्यास करायची आणि कधीही घराबाहेर पडली नाही. खाणे, अभ्यास आणि झोप, एवढेच तिच्या तयारीचे वेळापत्रक होते. दिव्या तिच्या यशाचे श्रेय तिच्या आईला देते जिने नेहमी तिच्या मुलीचा हात धरला आणि तिच्या वडिलांची उणीव जाणवू दिली नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोग