शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

बंगळुरूत एप्रिलपासून सुरू होणार आयफोनचे उत्पादन

By admin | Updated: January 2, 2017 17:31 IST

अ‍ॅपल कंपनी लवकरच भारतात आयफोनचे उत्पादन सुरू करण्याच्या तयारीत आहे.

ऑनलाइन लोकमतबंगळुरू, दि. 2 - अ‍ॅपल कंपनी लवकरच भारतात आयफोनचे उत्पादन सुरू करण्याच्या तयारीत आहे. भारतीय बाजारपेठ काबीज करण्याच्या दृष्टीनं बंगळुरू येथे आयफोन उत्पादन सुरू करण्याची घोषणा अ‍ॅपलने केली आहे, असं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे. अ‍ॅपलसाठी ओईएमचे (ओरिजनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चर) काम करणारी तैवानस्थित कंपनी विस्ट्रॉन बंगळुरूमधील पिन्या येथे औद्योगिक वसाहतीत आयफोनचे उत्पादन सुरू करणार आहे. एप्रिल महिन्यात उत्पादन सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतात उत्पादन सुरू करण्यासंदर्भात अ‍ॅपल कंपनी खूप गंभीर आहे. या वर्षाच्या शेवटापर्यंत मोबाइलचे संपूर्ण उत्पादन करण्यासाठी अ‍ॅपल कंपनी प्रयत्नशील राहणार आहे. बंगळुरूत अ‍ॅपल कंपनी जातीनं लक्ष घालणार असल्याची माहिती कंपनीच्या विविध सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. मात्र उत्पादन भारतात विकण्यासाठी अ‍ॅपल कंपनीला 12.5 टक्के आयात कर भरावा लागणार आहे. तैवानस्थित अ‍ॅपलची सहयोगी उत्पादक कंपनी असलेल्या फॉक्सकॉनने यापूर्वी महाराष्ट्रात प्रकल्प सुरू करणार असल्याचे जाहीर केले होते. पण या प्रकल्पात फक्त अ‍ॅपलचे उत्पादन तयार होणार असल्याचंही कंपनीनं सुरुवातीला सांगितले होते. मात्र त्यानंतर फॉक्सकॉनने इतर प्रतिस्पर्धी जिओमी आणि वन प्लस या मोबाईल बनवणा-या कंपन्यांशीही करार केल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे इथे अ‍ॅपलसोबत इतरही कंपन्यांचे मोबाईल बनवण्याची शक्यता आहे. अ‍ॅपल मोबाइलचे डिझाइन आणि डेव्हलपमेंट ऐक्सेलरेटर (उत्प्रेरक) आयओएस डेव्हलपर समुदायाला विकसित करण्यासाठी देणार आहे. तसेच भारतीय डेव्हलपर्सना मार्गदर्शनासाठी अ‍ॅपलची प्रोग्रॅमिंग भाषा जलद समजून अ‍ॅपल टीव्ही, अ‍ॅपल घड्याळ बनवण्यासाठी सहाय्यक ठरणार आहे. यंदा लवकरच ही सेवा लोकांच्या वापरात येणार आहे.