शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
5
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
6
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
7
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
8
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
9
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
10
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
11
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
12
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
13
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
14
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
15
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
16
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
17
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
18
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
19
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
20
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश

कचरा जाळणे ठरतेय आजारास निमंत्रण

By admin | Updated: February 22, 2016 00:02 IST

जळगाव : शहरातील वेगवेगळ्या भागात उघड्यावर कचरा जाळणे धोकादायक ठरत असून यामुळे आजारास निमंत्रण मिळते. यामधून निघणारा धूर जीवघेणे गंभीर आजार होण्यास कारणीभूत ठरु शकतो, त्यामुळे उघड्यावर कचरा न जाळण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

जळगाव : शहरातील वेगवेगळ्या भागात उघड्यावर कचरा जाळणे धोकादायक ठरत असून यामुळे आजारास निमंत्रण मिळते. यामधून निघणारा धूर जीवघेणे गंभीर आजार होण्यास कारणीभूत ठरु शकतो, त्यामुळे उघड्यावर कचरा न जाळण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.
शहरातील कचर्‍याची विल्हेवाट व्यवस्थित व्हावी म्हणून मनपाच्या वतीने शहरात वेगवेगळ्या भागात कचरा कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. असे असले तरी यामध्ये मनपा व काही नागरिकांच्याही चुका कचर्‍याच्या विल्हेवाटीस बाधा ठरतात.
कचरा कुंड्या भरल्या तरी त्यामधील कचरा उचलला जात नाही तर दुसकीरकडे काही नागरिक कचरा कुंडीत न टाकता कुंडीच्या बाहेर टाकतात. त्यामुळे तो अस्ताव्यस्त पसरतो. या दोन्ही कारणांमुळे नागरिक हा कचरा उघड्यावरच जाळतात. त्यामुळे त्यातून मोठ्या प्रमाणात धूर निघतो, जो आरोग्यास हानीकारक आहे.
सामान्य आजाराकडे दुर्लक्ष करु नका...
कचरा जाळल्याने निघणार्‍या धुरामुळे सर्दी, डोके दुखणे, सतत नाक गळणे आणि सर्दीची ॲलर्जी असे आजार होतात. ते तसे सामान्य आजार वाटतात, मात्र त्याकडे दुर्लक्ष न करता तात्काळ उपचार करणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

दमा होण्याची शक्यता...
सतत छातीमध्ये धूर गेल्याने श्वसनाचे आजार बळावतात. श्वसन क्रिया मंदावते, यामुळे सततचा खोकला, घशात खवखवणे असे घशाचेही आजार होतात. यामधून नंतर दमा सारखे गंभीर आजार होण्यास मदत मिळते. सोबतच अस्थमासारखेही आजार होतात, असे डॉक्टरांनी सांगितले.

डोकेदुखी, डोळे जळजळणे...
धुराच्या उग्र वासाने डोके भणभणते, यामुळे विचार करण्याची क्षमता कमी होते. तसेच डोळ्यात धूर गेल्याने डोळे चुळचुळ करतात. डोळ्यातून पाणी येते. हा धूर त्या परिसरातील घराघरात गेल्यावर त्याचा सर्वांना त्रास होऊन व तो घशावाटे पोटात गेल्याने पोटाचाही त्रास होतो. यामुळे वारंवार इन्फेक्शन होऊन आजारी पडण्याचे प्रमाण वाढते.

ह्रदयावरील दाब वाढतो...
कचर्‍यामधून निघणारा धूर नाका, तोंडावाटे पोटात, छातीत गेल्याने ह्रदयावरील दाब वाढतो. त्यामुळे त्याचा ह्रदयावर परिणाम होतो. तसेच फुफ्फुसाचाही आजार बळावतात.
एकूणच उघड्यावर कचरा जाळल्याने साध्या आजारापासून गंभीर आजार होण्यास निमंत्रण मिळते. त्यामुळे उघड्यावर कचरा जाळणे धोकादायक ठरु शकते, म्हणून असे प्रकार टाळणेच योग्य असल्याचे सांगितले जात आहे. तसेच नागरिकांच्याही आरोग्याच्या दृष्टीने मनपा प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन कचर्‍याची व्यवस्थित विल्हेवाचट लावण्याची मागणी आहे.