शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस अधिवेशनासाठी निष्ठावंतांना निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 06:20 IST

अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणी सदस्य व प्रदेश काँग्रेस समित्यांच्या प्रतिनिधींचा पक्षाच्या अधिवेशनावर असलेला वरचष्मा दूर करण्याचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी ठरविले आहे.

शीलेश शर्मा नवी दिल्ली : अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणी सदस्य व प्रदेश काँग्रेस समित्यांच्या प्रतिनिधींचा पक्षाच्या अधिवेशनावर असलेला वरचष्मा दूर करण्याचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी ठरविले आहे. गाव तसेच ब्लॉक स्तरावरील निष्ठावान पक्ष कार्यकर्त्यांना दिल्लीत आयोजिलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी राहुल गांधी यांनी आमंत्रित केले आहे. पक्षाच्या अधिवेशनाच्याइतिहासात असे पहिल्यांदाच घडत आहे. अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणी सदस्य, प्रदेश काँग्रेस समिती सदस्यांव्यतिरिक्त गाव वब्लॉक स्तरावरील जे कार्यकर्ते कधीही काँग्रेस पक्ष सोडून गेले नाहीत, त्यांची माहिती मिळविण्याचे आदेश राहुल गांधी यांनी विविध राज्यांचे प्रभारीपद सांभाळणाऱ्या पक्षाच्या महासचिवांना दिले. छोट्या राज्यांतून १० व मोठ्या राज्यांतून १५ निष्ठावान कार्यकर्त्यांना दिल्लीतील अधिवेशनास बोलाविण्याचे ठरले आहे. मात्र त्यांची माहिती जमविण्यात येत असल्याची कल्पना सुरवातीला महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आदी राज्यांना नव्हती. त्यामुळे तेथील कार्यकर्त्यांना अधिवेशनाला उपस्थित राहाता येणे शक्य नव्हते. ही बाब राहुल गांधी यांना कळल्यानंतरत्यांनी संबंधित राज्यांच्या प्रभारी महासचिवांची कानउघाडणी केली. निष्ठावंत कार्यकर्त्यांची माहिती तत्काळ मिळवून त्यांना अधिवेशनालाघेऊन येण्याचे आदेश गुरुवारी रात्री त्यांनी प्रदेशाध्यक्षांना दिले. त्यामुळे युद्धपातळीवर शोधाशोध करुन विविध राज्यांतील काँग्रेसप्रदेशाध्यक्षांनी गाव व ब्लॉक स्तरावरील २०० निष्ठावंत कार्यकर्ते शोधून काढले. ते सर्व दिल्लीतील अधिवेशनाला उपस्थित राहतील.