भुवनेश्वर : ओडिशा पोलिसांनी पुरी येथील यूट्यूबर व पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारी ज्योती मल्होत्रा यांच्या संबंधाची चौकशी सुरू केली आहे. पाक गुप्तचर यंत्रणांना संवेदनशील माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली ज्योतीला पोलिसांनी अटक केली आहे.
ज्योती सप्टेंबर २०२४ मध्ये पुरी येथे आली होती. तेव्हा तिने येथील एका महिला यूट्यूबरसोबत संपर्क केला होता. पुरीतील या यूट्यूबरने नुकतीच पाकिस्तानमधील करतारपूर साहिबा गुरुद्वाराला भेट दिली होती. ज्योती व या महिलेच्या संबंधाबद्दल चौकशी सुरू केल्याचे पुरीचे पोलिस अधीक्षक विनीत अग्रवाल यांनी सांगितले.
अशी अडकली ज्योतीज्योती मल्होत्रा ३० मार्च रोजी नवी दिल्लीतील पाक दूतावासात पाकिस्तान राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमात पाहुणी म्हणून गेली होती. तेथे तिचे स्वागत दूतावास अधिकारी दानिशने केले होते. हाच दानिश ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर निष्कासित झाला.२०२४ मध्ये पाकिस्तान व नंतर चीनला गेली तेव्हा सुरक्षा एजन्सींच्या रडारवर आली. १७ एप्रिल ते १५ मे २०२४ पर्यंत ती पाकिस्तानात होती. भारतात परतल्याच्या २५ दिवसांनी, १० जूनला ती चीनला गेली. तेथून ती १० जुलै रोजी नेपाळमधील काठमांडूला गेली.