शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

बौद्ध समाजातील युवक, युवती परिचय मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मेळाव्यात १७00 युवक, युवतींनी दिला परिचय

By admin | Updated: February 20, 2016 00:07 IST

अकोला: यशोदय जनकल्याण बहूद्देशीय सांस्कृतिक, आरोग्य, क्रीडा, शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने शुक्रवारी प्रमिलाताई ओक सभागृहात आयोजित बौद्ध समाजाच्या नवव्या राज्यस्तरीय परिचय मेळाव्याला युवक, युवतींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मेळाव्यामध्ये राज्यातून, परदेशातून आलेल्या १७00 युवक, युवतींनी परिचय दिला. मेळाव्यासाठी ३ हजार युवक, युवतींनी नोंदणी केली होती. यावेळी बौद्ध समाजातील विवाहयोग्य युवक, युवतींची स्वप्नपूर्ती परिचय पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. प्रमिलाताई ओक सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र दारोकार गुरुजी होते. प्रमुख अतिथी म्हणून अकोला बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. एस.जी. गवई, दीपक धांडे, ज्येष्ठ विधिज्ञ चंद्रकांत वानखडे, ॲड, प्रवीण तायडे, ॲड. गोळे, डॉ. प्रिया डोंगरे, मौलाना आझाद महामंडळाचे व्यवस्थापक संजय्

अकोला: यशोदय जनकल्याण बहूद्देशीय सांस्कृतिक, आरोग्य, क्रीडा, शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने शुक्रवारी प्रमिलाताई ओक सभागृहात आयोजित बौद्ध समाजाच्या नवव्या राज्यस्तरीय परिचय मेळाव्याला युवक, युवतींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मेळाव्यामध्ये राज्यातून, परदेशातून आलेल्या १७00 युवक, युवतींनी परिचय दिला. मेळाव्यासाठी ३ हजार युवक, युवतींनी नोंदणी केली होती. यावेळी बौद्ध समाजातील विवाहयोग्य युवक, युवतींची स्वप्नपूर्ती परिचय पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. प्रमिलाताई ओक सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र दारोकार गुरुजी होते. प्रमुख अतिथी म्हणून अकोला बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. एस.जी. गवई, दीपक धांडे, ज्येष्ठ विधिज्ञ चंद्रकांत वानखडे, ॲड, प्रवीण तायडे, ॲड. गोळे, डॉ. प्रिया डोंगरे, मौलाना आझाद महामंडळाचे व्यवस्थापक संजय पहुरकर, एमपीजीपीचे शाखा अभियंता संजय इंगळे, बी.आर. धाकडे, देशकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, शाहीर वसंतदादा मानवटकर, पी.जे. वानखडे, सरकारी विधिज्ञ संध्या इंगळे, डॉ. मनोहर घुगे, गवई गुरुजी, देवीदास सपकाळ, अशोक धांडे, प्रा. रणजित इंगळे, आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी भीमगीते सादर करण्यात आली. कार्यक्रमामध्ये मान्यवरांनी राज्यस्तरीय युवक, युवती परिचय मेळाव्याचे कौतुक केले. दरवर्षी या मेळाव्या समाजबांधवांची उपस्थिती आणि प्रतिसाद लाभत आहे. मेळाव्याला व्यापक स्वरूप प्राप्त होत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशोदय जनकल्याण बहूद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रा. रणजित इंगळे यांनी केले. संचालन किरण पळसपगार यांनी केले. आभार किशोर इंगळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुधाकर पाटील, अरविंद दंदी, कांताराम तायडे, पंजाबराव वर, संकेत इंगळे, रेखा गवई, जितू सिरसाट, प्रमोद तायडे, सुनील तेलगोटे, ॲड. ओम खंडारे, ॲड. विद्याधर सरकटे, बादल वानखडे, गौतम इंगोले, शरद इंगोले, अमोल अंजनकर, राजाभाऊ भटकर, पूनम वानखडे, नागेश वानखडे, रेश्मा वानखडे, पूजा चराटे, श्वेता वाहुरवाघ, सचिन तेलगोटे, पिंटू वानखडे, छोटू पाटील, प्रवीण इंगळे यांनी प्रयत्न केले. (प्रतिनिधी)