शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन : महाराष्ट्रातील २ व्यक्ती व ३ संस्थांना पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 02:26 IST

केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयातर्फे आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांगांमधील उल्लेखनीय

सुरेश भटेवरानवी दिल्ली : केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयातर्फे आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांगांमधील उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्ती, दिव्यांगांना मदत करणा-या संस्था, याखेरीज संशोधन संस्था, उत्कृष्ट दिव्यांगजन कर्मचारी अशा १४ विविध श्रेणींत राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आले.  त्यात मुंबई येथील प्रणय बुरडे, पुणे येथील गौरी गाडगीळ यांच्यासह, नॅशनल असोसिएशन आॅफ ब्लाइंड (नॅब), जळगाव पीपल्स को-आॅप बँक, नवी मुंबई महानगर पालिका अशा २ व्यक्ती व ३ संस्थांचा समावेश आहे. जन्मत:च डाउन सिंड्रोम आजाराने ग्रस्त प्रणय बुरडे यांनी दिव्यांगतेवर मात करीत स्वबळावर रोजगार मिळविला.डाउन सिंड्रोम आजारावर मात करीत पुण्याच्या गौरी गाडगीळने दिव्यांगांसाठीच्या आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत भारताला दोनदा रजत व दोनदा कांस्य पदक मिळवून दिले व तमाम दिव्यांगांसाठी आदर्श वस्तुपाठ निर्माण केला. गौरीच्या यशोगाथेवर ‘यलो’ हा मराठी चित्रपटही प्रदर्शित झालाय.दिव्यांगांसाठी कार्यरत देशातल्या सर्वोत्तम संस्थांमध्ये दोन संस्थांची निवड झाली. त्यात पहिला क्रमांक नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील ‘ईटीसी’ या दिव्यांगांना शिक्षण, प्रशिक्षण व सेवा देणा-या केंद्रास राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. हा उपक्रम राबविणाºया नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. रामस्वामींनी हा पुरस्कार स्वीकारला. दिव्यांगांसाठी विशेषत: अंधांसाठी ब्रेल लिपीत पुस्तके प्रकाशित करणा-या ब्रेल प्रेसचा एकमेव राष्ट्रीय पुरस्कार, मुंबईतल्या वरळी येथील नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड (नॅब) संस्थेला प्रदान करण्यात आला. दिव्यांगांसाठी संगणकावर सुलभ संकेतस्थळ निर्माण केल्याबद्दल उत्कृष्ट संकेतस्थळ पुरस्कार, दी जळगाव पीपल्स को-आॅप बँकेला प्रदान करण्यात आला.