शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामिक स्टेटबद्दल तरूणांना वाटणारे आकर्षण चिंताजनक - राजनाथ सिंह

By admin | Updated: November 29, 2014 12:13 IST

भारतातील तरूण इराकमधील इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या विचारधारेला भुलून त्याकडे आकर्षित होत आहेत, ही चिंताजनक बाब आहे, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.

ऑनलाइन लोकमत
गुवाहाटी २९ -  भारतातील तरूण इराकमधील इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या विचारधारेला भुलून त्याकडे आकर्षित होत आहेत, ही चिंताजनक बाब आहे, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. तरूणांना कट्टर धर्मवेडाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करणा-या या संघटनेचे देशासमोर मोठे आव्हान उभे आहे, असेही ते म्हणाले. तसेच पाकिस्तान गुवाहाटी येथे आयोजित करण्यात आलेल्या पोलिस महासंचालक आणि महानिरीक्षकांच्या ४९व्या परिषदेदरम्यान ते बोलत होते. आयएसमध्ये सामिल होण्यासाठी गेलेला कल्याणमधील चार तरूणांपैकी एक तरूण कालच भारत परत आल्याच्या पार्श्वभूमीवर सिंह यांचे वक्तव्य महत्वाचे मानले जाते. अशा तरूणांची ओळख पटवण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. 
यावेळी त्यांनी पोलिसांना  पाकिस्तानमधील काही शक्ती भारतात अस्थिरत माजवायचा प्रयत्न करत असल्याचे सांगत दहशतवादी संघटना अल-कायदाबद्दलही सतर्क राहण्याची सूचना दिली. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात हिंदूसोबतच मुसलमानांनीही मोठे योगदान दिले असून अल-कायदाचे मनसुबे हाणून पाडू असा विश्वास व्यक्त करत त्यांनी  त्यांनी यावेळी केला. देशातील सुरक्षा व्यवस्था कोणतेही आक्रमण थोपवून धरम्यासाठी सक्षम असल्याचेही ते म्हणाले. 
दरम्यान बर्दवान येथील स्फोटांचा छडा लावण्यात पश्चिम बंगाल पोलिस व एनआयएला यश मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.