शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
4
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
5
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
6
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
7
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
8
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
9
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
10
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
12
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
13
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
14
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
15
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
16
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
17
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
18
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
19
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
20
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

व्याजदर ‘जैसे थे’

By admin | Updated: February 9, 2017 01:43 IST

रिझर्व्ह बँकेने आपल्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात बुधवारी धोरणात्मक व्याजदर जैसे थे ठेवले. सलग दुसऱ्या आढाव्यात रिझर्व्ह बँकेने स्थिती जैसे थे ठेवली आहे.

मुंबई : रिझर्व्ह बँकेने आपल्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात बुधवारी धोरणात्मक व्याजदर जैसे थे ठेवले. सलग दुसऱ्या आढाव्यात रिझर्व्ह बँकेने स्थिती जैसे थे ठेवली आहे. रिझर्व्ह बँकेने म्हटले की, ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर, २0१६-१७ च्या चौथ्या तिमाहीपर्यंत ५ टक्क्यांवर नियंत्रण ठेवायचा आहे. मध्यम काळासाठी हे उद्दिष्ट २ टक्के फेरफारासह ४ टक्क्यांचे आहे. त्यानुसार, पतधोरण समितीने धोरणात्मक व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रपो दर ६.२५ टक्क्यांवर कायम राहील, तसेच रिव्हर्स रेपो दर ५.७५ टक्क्यांवर कायम राहील. पतधोरण समितीने म्हटले की, महागाईचा दर ४ टक्क्यांवर स्थिर ठेवण्याच्या उद्दिष्टास समिती बांधील आहे. त्यानुसार, महागाईचा दर आणखी खाली येणे आवश्यक आहे. विशेषत: संवेदनक्षम असलेला महागाईचा सेवा घटक आणखी खाली येण्याची गरज आहे. त्यासाठी धोरणात्मक व्याजदर आहे त्या स्थितीत ठेवण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. नोटाबंदीचा महागाईवर काय परिणाम होतो, हे अजून स्पष्ट व्हायचे आहे. या संक्रमणाच्या काळात आपली भूमिका समावेशीपणाकडून नैसर्गिकतेकडे नेण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. व्याजदर जैसे थे ठेवण्याची रिझर्व्ह बँकेची ही सलग दुसरी वेळ आहे. या आधी डिसेंबरच्या पतधोरण आढाव्यातही रिझर्व्ह बँकेने व्याजदर जैसे थे ठेवले होते.६.२५ टक्क्यांवर असलेला रेपो रेट आधीच सहा वर्षांच्या नीचांकावर आहे. आढाव्या आधी अनेक संस्थांनी जारी केलेल्या अंदाजात व्याजदरात कपात केली जाईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. 0.१५ टक्क्यांपर्यंत कपात होऊ शकते, असे वाटत होते.

पतधोरणामुळे सेन्सेक्स घसरलामुंबई : रिझर्व्ह बँकेने पतधोरणात अपेक्षित व्याजदर कपात न केल्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स घसरला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी मात्र, अंशत: वाढला. सेन्सेक्स ४५.२४ अंकांनी अथवा 0.१६ टक्क्यांनी घसरून २८,२८९.९२ अंकांवर बंद झाला. काल सेन्सेक्स १0४.१२ अंकांनी घसरला होता. निफ्टी मात्र, 0.७५ अंकांनी अथवा 0.0१ टक्क्याने वाढून ८,७६९.0५ अंकांवर बंद झाला. बँकांच्या समभागांना घसरणीचा सर्वाधिक फटका बसला. पीएनबी, अ‍ॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, इंडसइंड बँक, एसबीआय यांचे समभाग घसरले.