शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

पीयूसी नसल्यास वाहनांच्या विमा पॉलिसीचं होणार नाही नूतनीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2017 18:39 IST

नवी दिल्ली, दि. 10 - वाढत्या नागरीकरणानं वाहतुकीच्या समस्येनं डोकं वर काढलं असताना त्यातच दिवसागणिक वाहनांच्या संख्येने भर पडत आहे. त्यामुळे प्रदूषणातही मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं पाहायला मिळतंय. वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं वाहनाच्या विमा पॉलिसीचं नूतनीकरण करण्यासाठी नवा नियम लागू केला आहे. जर तुम्हाला वाहनाच्या विमा पॉलिसीचं नूतनीकरण करायचं आहे, तर ...

नवी दिल्ली, दि. 10 - वाढत्या नागरीकरणानं वाहतुकीच्या समस्येनं डोकं वर काढलं असताना त्यातच दिवसागणिक वाहनांच्या संख्येने भर पडत आहे. त्यामुळे प्रदूषणातही मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं पाहायला मिळतंय. वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं वाहनाच्या विमा पॉलिसीचं नूतनीकरण करण्यासाठी नवा नियम लागू केला आहे. जर तुम्हाला वाहनाच्या विमा पॉलिसीचं नूतनीकरण करायचं आहे, तर तुमच्याजवळ पीयूसी असणं गरजेचं आहे, असं सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं आहे. तुमच्याकडे गाडीची पीयूसी नसेल तर तुमच्या वाहनाच्या विमा पॉलिसीचं नूतनीकरण होणार नाही. वाहनातून होणा-या प्रदूषणाला आळा घालण्याच्या दृष्टीनं सर्वोच्च न्यायालयानं हे महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. त्यामुळे आता वाहनाच्या विमा पॉलिसीचं नूतनीकरण करायचं असल्यास वाहनाच्या मालकाजवळ पीयूसी असणं अनिवार्य आहे. प्रदूषण नियंत्रण कायद्याचं पालन व्हावं, यासाठी सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय दिला आहे. न्यायमूर्ती मदन बी लोकूर यांच्या समितीनं वाहन विमा पॉलिसी कंपन्यांना आदेश दिले आहेत की, पीयूसी नसलेल्या वाहनांच्या विमा पॉलिसीचं नूतनीकरण करू नका. न्यायमूर्ती मदन बी लोकूर समितीनं पॉल्युशन अंडर कंट्रोल (पीयूसी) केंद्रासाठी ऑल इंडिया रिअल टाइम ऑनलाइन प्रणाली सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जेव्हा वाहनधारक पीयूसी घेईल, त्यावेळी त्यामध्ये कोणताही घोटाळा होणार नाही.पीयूसी नसेल तर सी-लिंकवर ‘नो एन्ट्री’

वाहन प्रदूषण कमी करण्यासाठी सर्व वाहनचालकांकडे पीयूसी असणे बंधनकारक आहे. मात्र या नियमाकडे ब-याचदा वाहनचालक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येतेय. त्यामुळेच आता राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार मुंबई मध्य (ताडदेव) प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून पीयूसी तपासणीसाठी विशेष मोहीम जून महिन्यात राबविण्यात येणार आहे. ज्या वाहनांकडे ‘पीयूसी’ नसेल अशा वाहनांना वांद्रे-वरळी सागरी सेतूवर प्रवेश नाकारण्यात येणार आहे.