शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
3
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
4
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
5
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
6
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
7
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
8
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
9
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
10
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
11
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
12
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
13
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
14
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
15
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
17
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
18
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
19
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
20
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...

टॉवर चौक ऐवजी यंदा जुन्या न.पा.ची जागा ४० जणांचे अर्ज प्राप्त : गणेश मूर्ती विक्रेत्यांना दिलासा

By admin | Updated: August 25, 2016 22:35 IST

जळगाव : गणेश मूर्ती विक्रेत्यांना यंदा टॉवर चौका ऐवजी जुन्या न.पा. इमारतीची फुले मार्केट समोरील जागा व्यवसायासाठी दिली जाणार असून त्यासाठी विक्रेत्यांचे अर्ज येण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ४० जणांचे अर्ज प्राप्त झाले असल्याचे मनपा अतिक्रमण विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

जळगाव : गणेश मूर्ती विक्रेत्यांना यंदा टॉवर चौका ऐवजी जुन्या न.पा. इमारतीची फुले मार्केट समोरील जागा व्यवसायासाठी दिली जाणार असून त्यासाठी विक्रेत्यांचे अर्ज येण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ४० जणांचे अर्ज प्राप्त झाले असल्याचे मनपा अतिक्रमण विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
गेल्या अनेक वर्षांपासून टॉवर चौक ते चौबे शाळेपर्यंतच्या रस्त्यावर गणेशोत्सव काळात गणपती विक्रेते दुकाने लावत असत. गणेशोत्सव काळात प्रचंड गर्दीमुळे या रस्त्यावरून पायी चालणेही कठीण होत असे. त्यातच आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शहरातील प्रमुख रस्ते मोकळे करण्याची मोहीम सुरू असल्याने महापालिकेकडून विविध भागातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येत आहे.
अनेक दुकानांची गर्दी
टॉवर चौकापासून, शहर पोलीस स्टेशन, घाणेकर चौक, जुने शाहू रुग्णालय, शिवाजी रोडचा दर्शनी भागात गणपती विक्रीसाठीची शेकडो दुकाने लागत असत. यात गणपती भोवती आरास करण्यासाठी विविध वस्तू व शोभा वाढविणारी फुले, थर्माकोलच्या वस्तू मंदिरे अशी एक ना अनेक प्रकारची दुकाने या परिसरात लागत असत. महापालिकेच्या कारवाई सत्रामुळे या भागात यंदा दुकाने लावण्यास नकार देण्यात आला होता.
पर्यायी जागेची मागणी
टॉवर चौक, शहर पोलीस स्टेशन व फुले मार्केट परिसरात वर्षानुवर्षे बसणार्‍या गणपती मूर्ती विक्रेत्यांनी याप्रश्नी प्रशासनातील अधिकार्‍यांची भेट घेऊन पर्यायी जागा मिळावी अशी मागणी केली होती. टॉवर चौक हा शहरातील नागरिकांसाठी मध्यवर्ती परिसर असल्याने हजारो नागरिक या ठिकाणी येत असतात. ही बाब लक्षात घेऊन व नागरिची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाने या विक्रेत्यांना जुन्या न.पा. इमारतीच्या मोकळ्या जागेत दुकाने लावण्यास सूचना केली आहे. त्यानुसार अर्ज येण्यास सुरुवातही झाली आहे. गुरुवारअखेर ४० जणांचे अर्ज प्राप्त झाल्याची माहिती अतिक्रमण विभागाच्या सूत्रांनी दिली.
-------