शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

बेकार राहाण्यापेक्षा युवकांनी गोपालन, पानटपरी सुरू करावी; त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांची मुक्ताफळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 02:09 IST

सरकारी नोकऱ्यांसाठी युवकांनी राजकारण्यांचा पिच्छा पुरवू नये. त्याऐवजी त्यांनी पंतप्रधान मुद्रा योजनेचा लाभ घेऊन स्वत:चा व्यवसाय सुरु करावा.

आगरतळा : सरकारी नोकऱ्यांसाठी युवकांनी राजकारण्यांचा पिच्छा पुरवू नये. त्याऐवजी त्यांनी पंतप्रधान मुद्रा योजनेचा लाभ घेऊन स्वत:चा व्यवसाय सुरु करावा. बेकार राहाण्यापेक्षा युवकांनी गोपालन करावे किंवा पानटपरी सुरु करावी, अशी मुक्ताफळे त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव देव यांनी उधळली आहेत. भाजपा नेत्यांनी वेगवेगळ्या विषयांवरून वादग्रस्त विधाने करण्याचा सपाटा लावलेला असतानाच बिप्लव देव यांनी त्यांना आणखी एका विधानाची भर टाकली आहे. त्रिपुरातील एका चर्चासत्राचे उद्घाटन करताना बिप्लव देव पुढे म्हणाले की, सरकारी नोकरी मिळविण्यासाठी युवक अनेक वर्षे राजकारण्यांच्या मागे धावत असतात. त्यामुळे या युवकांच्या आयुष्यातील महत्त्वाची वर्षे वाया जातात. त्याऐवजी त्यांनी पानटपरीचा धंदा केला असता तर एव्हाना त्या प्रत्येक युवकाच्या बँक खात्यात ५ लाख रुपयांपर्यंत शिल्लक जमा झाली असती.बिप्लव देव अलीकडेच ऐश्वर्या राय व डायना हेडनची तुलना करणारे वादग्रस्त वक्तव्य केले होते.७५ हजार रुपयांच्या कर्जातून सुरू केलेल्या व्यवसायातून युवक दर महिना २५ हजारांचे उत्पन्न मिळवू शकतो. पदवीधर झाल्यानंतर शेती, कुक्कुटपालन आदी व्यवसाय करणे युवक कमीपणाचे समजतात. अशा विचारांमुळेच गेल्या २५ वर्षांत त्रिपुरातील युवक फारशी प्रगती करू शकले नाहीत.पदवीधर युवकांनी गोपालनाचा व्यवसाय सुरू करावा, असे सांगून ते पुढे म्हणाले की, प्रत्येक घरात गायी पाळल्या गेल्या पाहिजेत. गायीच्या दुधाला दर लीटरला ५० रुपये भाव मिळतो. गेल्या दहा वर्षांपासून नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधराने याच कालावधीत गोपालनाचा व्यवसाय केला असता, तर एव्हाना त्याच्या बँक खात्यात १० लाख रुपयांची शिल्लक जमा झाली असती.