शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
3
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
4
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
5
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
6
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
7
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
8
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
9
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
10
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
11
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
12
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
13
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
14
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
15
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
16
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
17
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
18
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
19
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...

रुग्णालयांच्या परिसरात सर्वत्र सीसीटीव्ही बसवा! महाविद्यालयांना वैद्यकीय आयोगाच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2024 09:49 IST

कोलकाता येथील निवासी डॉक्टरच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचना जारी

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : कोलकाता येथील निवासी डॉक्टरच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने सर्व वैद्यकीयमहाविद्यालयांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यात महाविद्यालयांत सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी धोरण तयार करण्याबरोबरच रुग्णालय परिसरात संध्याकाळी पुरेशी प्रकाश योजना करावी आणि असुरक्षित ठिकाणी सीसीटीव्ही बसवावेत आदी सूचनांचा समावेश आहे. 

कोलकाता येथील घटनेच्या निषेधार्थ देशातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी डॉक्टरांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या सर्व प्रकरणाची राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने गंभीर दखल घेतली असून, डॉक्टरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मेडिकल कॉलेजने काय करावे?

  • सुरक्षेच्या अनुषंगाने धोरण तयार करताना ओपीडी, वॉर्ड्स, अति तत्काळ विभाग, वसतिगृहे, निवासी डॉक्टरांच्या इमारती आणि संपूर्ण रुग्णालय परिसराचा विचार करावा. 
  • रुग्णालयाच्या आत आणि रुग्णालय परिसरात पुरेशी प्रकाश व्यवस्था करावी, ज्यामुळे आरोग्य कर्मचारी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकेल. तसेच सर्व असुरक्षित ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात यावेत.
  • रुग्णालय परिसरात पुरेशा प्रमाणात महिला आणि पुरुष सुरक्षारक्षकांची नियुक्ती करा.
  • कोणताही अनुचित प्रकार घडल्यास तत्काळ चौकशी करून पोलिसांत तक्रार करा. ४८ तासांत वैद्यकीय आयोगाला माहिती द्या.
टॅग्स :Medicalवैद्यकीयcollegeमहाविद्यालयcctvसीसीटीव्हीdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल