महिलेच्या घरात शिरून असभ्य वर्तन
By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST
नागपूर : जुन्या वादातून एका महिलेच्या घरात शिरून चौघांनी तिला अश्लील शिवीगाळ केली. तिच्याशी असभ्य वर्तन करून तिला आणि तिच्या परिवारातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. शनिवारी रात्री १०.३० वाजता ही घटना घडली.
महिलेच्या घरात शिरून असभ्य वर्तन
नागपूर : जुन्या वादातून एका महिलेच्या घरात शिरून चौघांनी तिला अश्लील शिवीगाळ केली. तिच्याशी असभ्य वर्तन करून तिला आणि तिच्या परिवारातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. शनिवारी रात्री १०.३० वाजता ही घटना घडली. पीडित महिला (वय ३०) समतानगरात राहते. तिच्या परिवारासोबत आरोपी युवराजसिंग मेजरसिंग (वय २२) याचा वाद आहे. त्यावरून शनिवारी रात्री १०.३० वाजता आरोपी युवराज, कालूसिंग (वय २४), मगनसिंग तरसिमलाल कारू (वय ४०) आणि गुणवंता दिलीप मेश्राम (वय १९) हे पीडित महिलेच्या घरात शिरले. आरोपींनी तिला आणि परिवाराला अश्लील शिवीगाळ करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच महिलेसोबत असभ्य वर्तन केले. पीडित महिलेच्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले. कारू आणि मेश्रामला पोलिसांनी अटक केली. दोघांचा शोध घेतला जात आहे.----