चेन्नई : भविष्यात भारतीय नौदल स्वदेशीकरणावर स्थिरस्थावर होणार असून, निरंतर परिश्रमानंतर हे दल ‘बायर नेव्ही’ ते ‘बिल्डर नेव्ही’ अशी कात टाकणार आहे, असे नौदलप्रमुख अॅडमिरल आर. के. धोवन म्हणाले. त्यांचा भर युद्धनौका आणि पाणबुडय़ांची स्वदेशात बांधणी करण्यावर होता.
धोवन यांच्या हस्ते शुक्रवारी आयएनएस सुमित्र नौदलाच्या सेवेत दाखल झाले. स्वदेशी बनावटीचे सुमित्र समुद्र किनारपट्टीच्या निगराणीसाठी तैनात केले आहे. या जहाजाचा उपयोग गस्त घालण्यासाठी करण्यात येणार आहे.
धोवन म्हणाले की, भारतीय नौदलाचे ब्लूप्रिन्ट स्वावलंबन आणि स्वदेशीकरण यावर घट्टपणो स्थिरावणार आहे. सध्या देशात विविध खासगी आणि सरकारी गोदीत 41 जहाज आणि पाणबुडय़ांची बांधणी सुरू आहे.
सुमित्र हे जहाज या श्रेणीतील चौथे जहाज आहे. हे जहाज सरकारी गोवा शिपयार्ड लि.मध्ये इनहाऊस डिझाईनच्या आधारावर बांधण्यात आले आहे.
आयएनएस सुमित्रला चेन्नई पोर्ट ट्रस्टवर सेवेत सामावून घेण्यात आले. ते चेन्नई येथे राहणार असून, पूर्व नौदल कमांडच्या फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ यांच्या संचालन नियंत्रणात राहील. 22क्क् टन वजनाचे हे जहाज 26 नॉट एवढा वेग प्राप्त करून शकते. यावर अत्याधुनिक मध्यम आणि अल्प अंतरार्पयत मारा करणारे शस्त्रस्त्र बसविण्यात आले आहे. यामध्ये 76 एमएमची मध्यम अंतर्पयत मारा करणारी तोफ, क्लोज इन सपोर्ट सिस्टम संकेत एमके थ्री आणि कम्युनिकेशन इंटेलीजन्स सिस्टम ईएलके 7क्36 चा समावेश आहे.
(वृत्तसंस्था)