शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

उत्कल एक्स्प्रेस अपघाताची चौकशी सुरू, प्रभूंचाही रेल्वे अधिकाऱ्यांना अल्टिमेटम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2017 16:58 IST

उत्कल एक्स्प्रेसच्या भीषण अपघातामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे.

उत्तर प्रदेश, दि. 20 - उत्कल एक्स्प्रेसच्या भीषण अपघातामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. या भीषण अपघातामुळे 23 जणांचा मृत्यू झाला असून, 97हून अधिक लोक जखमी झालेत. त्यामुळे रेल्वे मंत्री सुरेश प्रभूसुद्धा खडबडून जागे झाले आहेत. विरोधकांनी सुरेश प्रभूंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे या घटनेची तात्काळ दखल घेत सुरेश प्रभूंनी रेल्वे अधिकाऱ्यांना अल्टिमेटम दिलाय. अपघाताबाबतचा सविस्तर अहवाल संध्याकाळपर्यंत कळवा, तसेच अहवालात अपघाताला जबाबदार असलेल्या दोषींचीही नावे द्या, असे आदेश सुरेश प्रभूंनी दिले आहेत. उत्कल एक्स्प्रेसच्या भीषण अपघात प्रकरणात भारतीय कलम 304अ अंतर्गत अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यात खतौली येथे शनिवारी सायंकाळी पुरी-हरिद्वार उत्कल एक्स्प्रेसचे 14 डबे रुळावरून घसरून 23 प्रवासी मृत्युमुखी पडले आणि 97 हून अधिक जखमी झाले. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले असून, दोषींविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.रेल्वेच्या अधिका-यांनी सांगितले की, सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. जखमींना तत्काळ मदत करण्याच्या सूचना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्या. सुरेश प्रभू यांनी टिष्ट्वट करून, रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा घटनास्थळी रवाना झाले असल्याची माहिती दिली. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि सदस्य यांना मदत आणि बचावकार्याची देखरेख करण्यास सांगितले आहे. एनडीआरएफच्या तुकड्या गाझियाबादमधून मदतीसाठी रवाना झाल्या आहेत. मेडिकल व्हॅनही येथे पोहोचल्या आहेत. रेल्वे मंत्रालय सातत्याने उत्तर प्रदेश सरकारच्या संपर्कात आहे. राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आनंद कुमार यांनी सांगितले की, बचावकार्याला प्राधान्य देत आहोत. अडकून पडलेल्यांना बाहेर काढून त्यांच्यावर उपचार सुरू करणे गरजेचे आहे. घटनास्थळी विजेची व्यवस्था केली आहे. रेल्वे प्रवक्त्याने सांगितले की, घटनास्थळी मदतकार्य वेगाने सुरू आहे. राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी अपघाताबद्दल रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये देण्याची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे, तर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये देण्यात येतील.