शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

मतदानयंत्रांच्या विरोधात मोर्चेबांधणीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 01:20 IST

कर्नाटकसह काही राज्यांच्या विधानसभा तसेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबाबत (ईव्हीएम) कोणतीही जोखीम घेण्यास काँग्रेस तयार नसून, संसदेच्या हिवाळी अधिवेशनानंतर हा मुद्दा बाहेर काढण्याची तयारी पक्षाच्या नेत्यांनी केली आहे.

- शीलेश शर्मानवी दिल्ली - कर्नाटकसह काही राज्यांच्या विधानसभा तसेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबाबत (ईव्हीएम) कोणतीही जोखीम घेण्यास काँग्रेस तयार नसून, संसदेच्या हिवाळी अधिवेशनानंतर हा मुद्दा बाहेर काढण्याची तयारी पक्षाच्या नेत्यांनी केली आहे.हिमाचल व गुजरातमधील पराभव स्वीकारून या मुद्द्यावर काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले नसले, तरी या मुद्द्यावर गैरभाजपा पक्षांची बैठक बोलावण्याचा निर्णय घेतला आहे, असे काँग्रेसच्या नेत्याने सांगितले.मतदानयंत्रांबाबत उपस्थित केल्या जात असलेल्या शंकांच्या स्थितीत निष्पक्ष निवडणुका होण्यासाठी कोणता मार्ग अवलंबिला जावा, यावरही विरोधी पक्षांच्या बैठकीत विचारविनिमय होणार आहे. गुजरातेत ईव्हीएममधील हेराफेरीमुळेच काँग्रेस पराभूत झाली आणि भाजपाने पुन्हा सत्ता मिळवली, याचे पुरावे मिळत असल्यामुळे काँग्रेसचे नेते या निर्णयापर्यंत आले आहेत.ईव्हीएमच्या विरोधात समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टीसह इतर अनेक पक्षांनी वेळोवेळी आवाज उठवलेला आहे. निवडणूक आयोग व भाजपाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. परंतु आता काँग्रेसने हा मुद्दा हाती घेऊन तो तडीस नेण्याची तयारी सुरू केली आहे.जगभरातील तज्ज्ञांशी काँग्रेस करतेय संपर्कईव्हीएमबाबतच्या चर्चेला मूर्त स्वरूप देण्यासाठी ५ जानेवारीला विरोधी पक्षांची बैठक बोलावण्याबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी विविध पक्षांशी प्राथमिक चर्चा केलेली आहे. आगामी निवडणुका ईव्हीएमऐवजी मतपत्रिकांद्वारे घेण्यात याव्यात, यासाठी या बैठकीत कायदेशीर व राजकीय लढाईची रणनीती तयार करण्यात येईल. ईव्हीएम हॅक करून दुरुपयोग सिद्ध करण्यासाठी जगभरातील तज्ज्ञांशीही काँग्रेस संपर्क साधण्याच्या तयारीत आहे, असे संकेत मिळत आहेत.

टॅग्स :ElectionनिवडणूकIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस