शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

...तर अ‍ॅम्बी व्हॅलीचा लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 03:59 IST

नवी दिल्ली : गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी सहारा उद्योग समूहाचे प्रमुख सुब्रतो राय यांनी येत्या ७ सप्टेंबरपर्यंत १,५०० कोटी ‘सेबी’कडे जमा न केल्यास सहाराच्या पुणे जिल्ह्यातील अ‍ॅम्बी व्हॅलीचा प्रत्यक्ष लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिला.हा लिलाव मुंबई उच्च न्यायालयाच्या ‘आॅफिशियल लिक्विडेटर’मार्फत केला जाणार आहे. ...

नवी दिल्ली : गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी सहारा उद्योग समूहाचे प्रमुख सुब्रतो राय यांनी येत्या ७ सप्टेंबरपर्यंत १,५०० कोटी ‘सेबी’कडे जमा न केल्यास सहाराच्या पुणे जिल्ह्यातील अ‍ॅम्बी व्हॅलीचा प्रत्यक्ष लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिला.हा लिलाव मुंबई उच्च न्यायालयाच्या ‘आॅफिशियल लिक्विडेटर’मार्फत केला जाणार आहे. त्यासाठी प्रसिद्ध करायच्या लिलावाच्या नोटिशीचा मसुदा न्या. दीपक मिश्रा, न्या. रंजन गोगोई व न्या. ए. के. सिक्री यांच्या खंडपीठाने मंजूर केला. ‘आॅफिशियल लिक्विडेटर’ने लिलावाची नोटीस १४ आॅगस्टरोजी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्धकरून इच्छुकांकडून बोलीमागाव्यात. त्यापुढील कारवाई,राय दिलेल्या मुदतीत १,५०० कोटी रुपये भरतात की नाही हेपाहून ठरविली जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.न्यायालयाने आदेश देऊनही गुंतवणुकदारांचे पैसे परत न केल्याबद्दल सुब्रतो राय गेली दोन वर्षे तुरुंगात आहेत. जामिनासाठी १० हजार कोटी भरण्याचा आदेश झाला. पण त्यांनी तेही भरले नाहीत. मध्यंतरी आईच्या निधनानंतर काही काळ त्यांना पॅरॉलवर सोडण्यात आले होते.