शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आधार लाभार्थींची माहिती सरकारी वेबसाईटकडून उघड, युनिक आयडेंटिटी अ‍ॅथॉरिटीने घेतली त्वरेने दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 04:28 IST

नवी दिल्ली : माहितीचा अधिकार कायद्याखाली केलेल्या एका आरटीआय अर्जाला उत्तर देताना आधार कार्ड तयार करणा-या युनिक आयडेंटिटी अ‍ॅथॉरिटीने म्हटले की, केंद्र आणि राज्य सरकारच्या २१० वेबसाइटस्नी काही आधार लाभार्थींची नावे पत्त्यांसह माहिती सार्वजनिक केली आहे.

नवी दिल्ली : माहितीचा अधिकार कायद्याखाली केलेल्या एका आरटीआय अर्जाला उत्तर देताना आधार कार्ड तयार करणा-या युनिक आयडेंटिटी अ‍ॅथॉरिटीने म्हटले की, केंद्र आणि राज्य सरकारच्या २१० वेबसाइटस्नी काही आधार लाभार्थींची नावे पत्त्यांसह माहिती सार्वजनिक केली आहे. या घटनेची त्वरेने दखल घेत अ‍ॅथॉरिटीने या वेबसाइटस्वरून ही माहिती लगेच हटविण्याचे आदेशही दिले आहेत. पुरेशी काळजी घेतल्याशिवाय प्रत्येक गोष्टीसाठी ऊठसूट आधार कार्ड अनिवार्य करणे कितपत सुरक्षित आहे याचा गौप्यस्फोटच या आरटीआय अर्जामुळे झाला आहे.युनिक आयडेंटिटी अ‍ॅथॉरिटीद्वारे आधार कार्डावर भारताच्या प्रत्येक नागरिकाला १२ अंकांचा एक विशिष्ट ओळख क्रमांक दिला आहे. देशात कुठेही हा क्रमांक, कार्डधारकाचे नाव तसेच अधिकृत पत्त्यासाठी पुरावा मानला जातो. आधार कार्डाशी संलग्न असलेली नावे, पत्ते व्यक्तिगत माहितीचा डेटा, युनिक आयडेंटिटी अ‍ॅथॉरिटीने कधीही सार्वजनिक केलेला नाही. तथापि, सरकारने विविध सरकारी योजनांसाठी आधार कार्ड अनिवार्य केल्यानंतर, केंद्र सरकार व राज्य सरकारचे विविध विभाग तसेच शैक्षणिक संस्थांच्या गलथानपणामुळे जवळपास २१० वेबसाईटस्नी लाभार्थींची नावे, पत्ते आधार कार्ड क्रमांक यासह अन्य माहिती सार्वजनिक केली. हे उल्लंघन कोणी कधी केले, हे मात्र स्पष्ट होऊ शकलेले नाही.युनिक आयडेंटिटी अ‍ॅथॉरिटीने म्हटले आहे की, आधार कार्डाबाबत आजवरची धोरणे व प्रक्रियांची वारंवार समीक्षाही करण्यात आली आहे. आधार अ‍ॅथॉरिटीद्धारे वेळेवर माहिती अपडेट केली जाते. यूआयडीएआय परिसराच्या आत आणि बाहेर विशेषत: डेटा केंद्रांवर सुरक्षेबाबत पुरेशी काळजी घेण्यात आली आहे.’>माहितीच्या अर्जातून प्रकरण समोरआरटीआय अर्जाद्वारे ही बाब लक्षात आल्यानंतर युनिक आयडेंटिटी अ‍ॅथॉरिटीने लगेच या विसंगतीची दखल घेतली व तमाम वेबसाइटस्वरून ही मौल्यवान माहिती लगेच हटवण्याचे आदेश जारी केले.अ‍ॅथॉरिटीने दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे की ‘आधार कार्डाच्या माहितीबाबत यूआयडीएआयचे एक सुव्यवस्थित तंत्र आहे. व्यक्तिगत माहितीचा उच्चस्तरीय डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी सातत्याने या तंत्राला विकसित व उन्नत बनवले जात आहे. डेटा व खाजगी माहितीची सुरक्षा अबाधित राहावी अशाच रीतीने हे तंत्र विकसित करण्यात आले आहे.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड