शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

महागाई आता नोकऱ्यांवर उठली, अनेकांना मिळाला 'नारळ'; कंपन्यांकडून कर्मचारी कपात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 07:25 IST

जगातील अनेक देशांत महागाईने मंदीचा प्रभाव वाढत असल्यामुळे अनेक कंपन्यांनी खर्च कमी करण्यासाठी कर्मचारी कपात सुरू केली

नवी दिल्ली-

जगातील अनेक देशांत महागाईने मंदीचा प्रभाव वाढत असल्यामुळे अनेक कंपन्यांनी खर्च कमी करण्यासाठी कर्मचारी कपात सुरू केली असून भारतातही त्याचा परिणाम दिसून येऊ लागला आहे. भारतात अनेक स्टार्टअप कंपन्यांनी कर्मचारी संख्या कमी केली आहे. 

स्मार्टफोन उत्पादक चिनी कंपनी शाओमीने आपल्या ९०० कर्मचाऱ्यांना काढले आहे. अमेरिकेतील अॅपल आणि मायक्रोसॉफ्ट यांसह अनेक कंपन्यांनीही नोकरकपात केली आहे. 

प्लॅटफॉर्म क्रंचबेसनुसार यंदा अमेरिकेत जुलैपर्यंत ३२ हजार टेक कर्मचाऱ्यांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. लेऑफ डॉट एफवायआयच्या माहितीनुसार १ एप्रिलपासून ३४२ टेक कंपन्या व स्टार्टअप कंपन्या यांनी ४३ हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले आहे. 

भारतात नोकरभरती थांबवलीअॅपलने १०० कंत्राटी कामगारांना काढलं आहे. मायक्रोसॉफ्टने २ हजारांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना काढले आहे. नेटफ्लिक्स, शॉपिफाई, कॉइनबेस आणि अलिबाबा यांसारख्या बड्या कंपन्यांनीही काही प्रमाणात कर्मचारी कपात केली आहे. या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी भारतातील नोकरभरती थांबवली आहे. 

खर्चात ४० टक्के कपातशेअरचॅट आणि मोजोचे चीफ कमर्शियल ऑफिसर अजित वर्गीस यांनी सांगितले की स्टार्टअप कंपन्या विपणन खर्चा ३० ते ४० टक्के कपात करीत आहेत. प्रस्थापित कंपन्यांतील खर्चकपात १० ते १५ टक्के आहे. 

कर्मचारी कपातओला कॅब- २,१००ब्लिकिट- १,६००व्हाईटहॅट-ज्युनिअर- १,३००लीडो लर्निंग- १,२००अनअॅकेडमी- ९२५वेदांतू- ६२४कार्स २४- ६००एमफाइन- ६००ट्रेल- ४००टॉपर- ३००

भारतात स्टार्टअप कंपन्यांनी १२ हजार कर्मचाऱ्यांना काढले- २०२२ च्या पहिल्या सहा महिन्यांत भारतातील स्टार्टअप कंपन्यांनी १२ हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले आहे. - हे वर्ष संपेपर्यंत ही संख्या ६० हजारापर्यंत पोहोचू शकते. कर्मचारी कपात करणाऱ्या कंपन्यांत ओला, ब्लिकिट, बायजूज, अनअॅकेडमी, वेदांतू, कार्स २४, मोबाइल प्रीमिअर लीग, लीडो लर्निंग, एमफाइन, ट्रेल आणि फरलॅको यांचा समावेश आहे.

टॅग्स :jobनोकरीInflationमहागाई