शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

महागाईचा भडका! घरगुती गॅस सिलेंडरचे दर वाढले; सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 07:55 IST

सिलेंडरच्या दरात वाढ झाल्याने रेस्टॉरंट, हॉटेलमधील जेवणाचे दरही वाढण्याची शक्यता आहेत

नवी दिल्ली - मार्चच्या पहिल्याच दिवशी महागाईने सर्वसामान्यांना मोठा झटका दिला आहे. घरगुती गॅस सिलेंडरचे दर ५० रुपयांनी वाढले आहेत. आता मुंबईत सिलेंडरचे दर १,१०२.५० रुपये, नागपूरला १,१५४.५० रुपये, नाशिकला १,०५६.५० रुपये झाले आहेत. त्यामुळे होळीपूर्वी महागाईचे चटके सामान्य माणसाला बसणार आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, १४.२ किलो घरगुती गॅस सिलेंडरचे दर ५० रुपयांनी वाढले आहेत. तर १९ किलो व्यावसायिक सिलेंडरचे दर ३५०.५० रुपयांनी वाढले आहेत. नवीन दर आजपासून लागू होणार आहेत. लोकल टॅक्स कारणाने घरगुती गॅस सिलेंडरचे दर प्रत्येक राज्यात वेगवेगळे असतात. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ऑईल कंपन्यांनी घरगुती गॅसच्या किंमतीत वाढ केली होती. त्यानंतर पुन्हा ही नवी दरवाढ करण्यात आली आहे. 

सिलेंडरच्या दरात वाढ झाल्याने रेस्टॉरंट, हॉटेलमधील जेवणाचे दरही वाढण्याची शक्यता आहेत. महिन्याच्या पहिल्याच दिवशी झालेल्या वाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडण्याची चिन्हे आहेत. मागील वर्षी ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी ६ जुलैला घरगुती गॅसच्या किंमतीत वाढ केली होती. गेल्या वर्षी चारवेळा गॅसच्या किंमती बदलल्या होत्या. कंपन्यांनी मार्च २०२२ रोजी ५० रुपये, मे २०२२ मध्ये ५० रुपये त्यानंतर ३.५० रुपये आणि जुलै २०२२ मध्ये ५० रुपये वाढ केली होती. 

जगात महागाई घटली, भारतात मात्र वाढली!  जानेवारीमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात महागाई कमी झालेली असताना. भारतात मात्र वाढली. गॅस, खते, कॉफी-चहा, कापूस आणि खाद्यतेल यांसारख्या १० वस्तूंचे दर भारतात दुप्पट झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र, ते ४८ टक्के स्वस्त झाले आहे. जानेवारीत किरकोळ क्षेत्रातील महागाईचा दर वाढून ६.५% होण्यामागेही हेच कारण होते. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये महागाई ६ टक्क्यांच्या खाली आली होती. नैसर्गिक गॅस जागतिक बाजारात २८.६ टक्के स्वस्त झाला. भारतात मात्र तो ९५ टक्के महागला. जानेवारीत जागतिक बाजारात युरियाचे भाव सर्वाधिक ४७.६ टक्के कमी झाले. भारतात मात्र ते ५.२ टक्के वाढले.  

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडर