जातीवैधता प्रमाणपत्राअभावी शेलकर ग्रा.पं.सदस्यत्वासाठी अपात्र
By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST
लोहगड : ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर सहा महिन्यात जातीवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे दाखल प्रकरणात अपर जिल्हाधिकार्यांनी बार्शीटाकळी तालुक्यातील धानोरा ग्रामपंचायतीच्या एका सदस्यास सदस्यत्वासाठी अपात्र घोषित केल्याची घटना बुधवारी घडली आहे.
जातीवैधता प्रमाणपत्राअभावी शेलकर ग्रा.पं.सदस्यत्वासाठी अपात्र
लोहगड : ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर सहा महिन्यात जातीवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे दाखल प्रकरणात अपर जिल्हाधिकार्यांनी बार्शीटाकळी तालुक्यातील धानोरा ग्रामपंचायतीच्या एका सदस्यास सदस्यत्वासाठी अपात्र घोषित केल्याची घटना बुधवारी घडली आहे.धानोरा ग्रामपंचायतीची निवडणूक ४ ऑक्टोबर २०१२ रोजी झाली होती. त्या निवडणुकीत साहेबराव बंसिरा शेलकर हे ग्रामपंचायतीच्या वॉर्ड क्रमांक दोनमधून निवडून आले होते. शेलकर यांनी निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करताना अर्जासोबतचे हमीपत्र लिहून दिले होते. त्या हमीपत्रामध्ये जातीवैधता प्रमाणपत्र निवडून आल्यानंतर सहा महिन्यांच्या आत सादर करू, असे नमूद केले होते. तथापि, शेलकर यांनी जातीवैधता पडताळणी समितीचे जातीवैधता प्रमाणपत्र तहसीलदार अथवा निवडणूक निर्णय अधिकारी, संबंधित ग्रामपंचायतचे सचिव वा कोणत्याही सक्षम अधिकार्यांकडे सादर केले नव्हते. धानोरा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व त्या निवडणुकीतील उमेदवार ज्ञानदेव आडोळे यांनी याबाबत अपर जिल्हाधिकार्यांकडे याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर अपर जिल्हाधिकार्यांनी सुनावणी घेतली. सुनावणीअंती साहेबराव शेलकर यांनी निवडणुकीत निवडून आल्यानंतर सहा महिन्यांच्या निर्धारित कालावधीत जातीवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे त्यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम १० (१) (अ) नुसार धानोरा ग्रामपंचायत सदस्यत्वासाठी अपात्र घोषित करणारा आदेश दिला. (वार्ताहर)०००००००००००००००००००००००००००००००००००