शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
2
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
3
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
4
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
5
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
6
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
7
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
8
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
9
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
10
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
11
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
12
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
13
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
14
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
15
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
16
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
17
हत्ती आणि हरीण; पूरग्रस्तांना फक्त आर्थिक नव्हे, मानसिक आधाराची गरज!
18
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
19
राहुल गांधी यांचे 'नागरिकत्व' आणि 'ईडी'; या एन्ट्रीमुळे प्रकरणाला अनपेक्षित वळण
20
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला

दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 07:51 IST

केंद्र व राज्य सरकार संयुक्तपणे राबवत असलेल्या 'कुसुम घटक ब' योजनेसाठी निधी उभारणीच्या उद्देशाने राज्य सरकारने उद्योगपती व व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा टाकला आहे.

नागपूर : केंद्र व राज्य सरकार संयुक्तपणे राबवत असलेल्या 'कुसुम घटक ब' योजनेसाठी निधी उभारणीच्या उद्देशाने राज्य सरकारने उद्योगपती व व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा टाकला आहे. दिवाळी पूर्वीच औद्योगिक व वाणिज्यिक वीज प्रकारात ९.९० पैसे प्रतियुनिट वाढ करण्यात आली. राज्य सरकारचा दावा आहे की, या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा सुलभहोईल, तसेच उद्योगांवरील क्रॉस सबसिडीचा भार कमी होईल.

मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत वीज कंपनीमार्फत विकल्या जाणाऱ्या विजेवर अतिरिक्त विक्रीकर आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. या निधीमधून 'प्रधानमंत्री कुसुम घटक-ब' तसेच राज्य सरकारची सौर कृषिपंप योजना राबविली जाईल. यानुसार रिलायन्स एनर्जी, टाटा पॉवर, बेस्ट तसेच महावितरणच्या शहर क्षेत्रातील औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांकडून हा कर वसूल होणार आहे. सध्या या ग्राहकांकडून प्रतियुनिट ११.०४ पैसे आकारले जात होते. त्यामध्ये ९.९० पैसे वाढ होऊन आता एकूण वसुली २०.९४ पैसे प्रतियुनिट इतकी होईल.

काय आहे योजना ?'कुसुम घटक ब' योजनेंतर्गत मागणीवर शेतकऱ्यांना सौर कृषिपंप दिले जातात. लाभार्थी जर अनुसूचित जाती /जमातीतील असेल, तर त्याला एकूण खर्चाच्या केवळ ५ टक्के रक्कम भरावी लागते. केंद्र ३० टक्के खर्च उचलते.शेतकऱ्यांसाठी उद्योगांकडून वसुली आर्थिक संकटाने त्रस्त राज्य सरकारपुढे संकटातील शेतकऱ्यांना मदत करण्याची जबाबदारीही आहे. जाणकारांच्या मते, त्यासाठी व्यापारी व उद्योजकांकडून वसुली करून सरकार निधी उभारेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Extra Electricity Charge on Businesses Before Diwali for Farmers' Scheme

Web Summary : Maharashtra imposes extra electricity charges on industries and businesses before Diwali, increasing rates by ₹9.90 per unit. This aims to fund the Kusum solar pump scheme for farmers and reduce cross-subsidy burdens on industries, benefiting farmers with daytime electricity.
टॅग्स :electricityवीजMaharashtraमहाराष्ट्र