शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

सगळं सांगून टाकलं की... इंद्राणीचा 'हा' व्हिडीओ चिदंबरम यांच्यासाठी ठरू शकतो डोकेदुखी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2019 14:38 IST

चिदंबरम यांच्याशी झालेल्या भेटीच्या वृत्तालाही इंद्राणी दुजोरा देते

नवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणात इंद्राणी मुखर्जीने चौकशी अधिकाऱ्यांना दिलेल्या साक्षीमध्ये सांगितलं होतं की चिदंबरम यांच्याशी भेट झाली होती. त्यावेळी चिदंबरम यांनी त्यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांच्या व्यवसायात मदत करण्यास सांगितले. टाइम्स नाऊ या इंग्रजी वृत्तवाहिनीकडे इंद्राणीचा तो व्हिडीओ आहे ज्यात तिने चिदंबरम यांच्या भेटीबाबतचा उल्लेख केला आहे. 

व्हिडीओच्या सुरूवातीला इंद्राणी मुखर्जी सांगते की तुम्हाला याची माहिती मिळेल. चिदंबरम यांच्याशी झालेल्या भेटीच्या वृत्तालाही ती दुजोरा देते. इंग्रजी वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने त्यांच्याशी साधलेला संवाद असा आहे की, 

रिपोर्टर - मला जाणून घ्यायचं आहे की, तुम्ही 2008 मध्ये मंत्री चिदंबरम यांना भेटला होता का?इंद्राणी - होय, कार्ती यांना भेटले होते. रिपोर्टर - कार्ती नव्हे तर मंत्री पी. चिदंबरम यांच्याशी तुमची मुलाखत झाली होती का?इंद्राणी - होय, 2007 मध्ये भेटलो होतो. रिपोर्टर - तेव्हा चिदंबरम यांनी काय सांगितले होते ज्यावेळी तुम्ही त्यांना नॉर्थ ब्लॉकमध्ये भेटला होता?इंद्राणी - ते तुम्हाला माहिती पडेल, मी ही माहिती देऊ शकत नाही ती गोपनीय आहे. त्यानंतर कार्ती चिदंबरम यांच्या खोट्या बोलण्याच्या आरोपावर इंद्राणी मुखर्जीने उत्तर दिलं. तुम्ही वारंवार खोटं बोलत आहात असं कार्ती चिदंबरम सांगत आहे असा प्रश्न रिपोर्टरने विचारला. इंद्राणी - ते तुम्हाला माहित पडेल, त्यांना जे बोलायचं आहे ते बोलू शकतात. रिपोर्टर - काय खरचं मंत्री चिदंबरम यांनी तुम्हाला सांगितलं होतं का की त्यांचा मुलगा कार्तीला मदत करा?

इंद्राणी - मी याठिकाणी काहीच सांगू शकत नाही, सगळं तुम्हाला माहित पडेल. हो, त्यांना सांगितलं होतं. पण मी इथे काही बोलू शकत नाही. तुम्हाला माहित हवं मी काय बोलते. हे सर्व गोपनीय आहे. रिपोर्टर - त्यांचे तुमच्याशी नेमकं काय बोलणं झालं होतं?इंद्राणी - मी नाही सांगू शकत. हे खरोखरचं गोपनीय आहे. रिपोर्टर - आम्हाला फक्त हे समजून घ्यायचं आहे की, चिदंबरम त्यांच्या वकिलांना वारंवार सांगतायेत की तुम्ही खोटं बोलत आहातइंद्राणी - मला काही फरक पडत नाही ते त्यांच्या वकिलांना काय सांगतायेत ते. ही माझी समस्या नाही. मी फक्त एक साक्षीदार आहे त्यामुळे मला काही त्रास नाही. रिपोर्टर - त्यांनी तुम्हाला काय सांगितलं होतं? कार्तीला मदत करा असं चिदंबरम बोलले होते का?इंद्राणी - होय, त्यांना मला हे सांगितले होते. रिपोर्टर - जेव्हा तुम्ही कार्ती यांना भेटला होता त्यावेळी कार्तीने तुमच्याकडे पैशांची मागणी केली होती का?इंद्राणी - होय, त्यांनी हे केलं होतं. रिपोर्टर - मागणी किती केली होती?इंद्राणी - 1 मिलियन डॉलररिपोर्टर - कार्तीने स्पष्ट शब्दात तुमच्याकडे ही मागणी केली होती?इंद्राणी - होयरिपोर्टर - हे सर्व तुम्ही कोर्टात कॅमेरासमोर सांगितलं होतं का?इंद्राणी - होय, मी सांगितलं होतं. 

रिपोर्टर - पिता-पूत्र दोघांचेही असं म्हणणं आहे की, तुमच्या सारख्या महिलेवर विश्वास ठेऊ शकत नाही?इंद्राणी - ती त्यांची समस्या आहे त्या दोघांनी माझ्यावर विश्वास ठेवावा की नाही. रिपोर्टर - आपण पैसे दिले होते का?इंद्राणी - कोर्टाला माझ्यावर विश्वास आहे, हे तुम्हाला माहित पडेल. (हा व्हिडीओ 2008 चा आहे)

टॅग्स :Indrani Mukherjeeइंद्राणी मुखर्जीP. Chidambaramपी. चिदंबरम