इंदूर: मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये एका प्रेम कहाणीचा दुर्दैवी शेवट झाला आहे. एकमेकांसोबत मरण्याची शपथ घेऊन प्रेमी युगुलानं छतावरून उडी मारण्याचा निर्णय घेतला. मात्र शेवटच्या क्षणी मुलीनं मुलाचा हात सोडला. मुलानं छतावरून उडी मारल्यानं त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.नकली केसांमधून सोनं तस्करी करणारे दोघे ताब्यात, हेअरस्टाइलने पोहोचवलं तुरूंगात!गुनामध्ये वास्तव्यास असलेला मोनू त्याच्या अल्पवयीन प्रेयसीसोबत इंदूरला पळून आला होता. या प्रेमी युगुलाला शोधत गुना पोलीस इंदूरला पोहोचले. पोलिसांना पाहताच दोघे छतावर पोहोचले आणि हा प्रकार घडला. इंदूरच्या मुसाखेडी भागात शनिवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांनी मोनूच्या विरोधात अपहरणाची तक्रार दाखल केली होती.स्वत:च्याच मृत्यूचा बनाव करणाऱ्या कर्जबाजारी व्यक्तीला ठोकल्या बेड्यामुलीच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केल्यानंतर गुना पोलिसांनी इंदूर पोलिसांच्या सहकार्यानं दोघांचा शोध सुरू केला. मोनू आणि त्याची प्रेयसी आझाद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मुसाखेडीमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी मोनू राहत असलेलं ठिकाण गाठलं. पोलिसांना पाहताच मोनू आणि त्याची प्रेयसी छतावर गेले. दोघे सोबत जगणार नसू, तर सोबत मरू, अशी शपथ त्यांनी घेतली. यानंतर मोनूनं छतावरून उडी मारली. मात्र अल्पवयीन मुलीनं उडी घेतली नाही. पोलिसांनी तिला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिलं आहे.या प्रकरणात पोलिसांनी मोनू आणि त्याची प्रेयसी राहत असलेल्या घराच्या मालकाची चौकशी केली. 'गुरु ओझा नावाची व्यक्ती मोनूला घेऊन ५ दिवसांपूर्वी आपल्याकडे आली होती. मोनूसोबत असलेल्या मुलीनं महिलांसारखा श्रृंगार केला होता. ती मोनूची पत्नी वाटत होती. मी त्यांच्याकडे ओळखपत्रांची मागणी केली. त्यावर आम्हाला कागदपत्रं गुनावरून मागवावी लागतील, असं उत्तर त्यांनी दिलं,' अशी माहिती घर मालकानं दिली.
तुझ्यासोबतच मरेन म्हणत प्रियकराची छतावरून उडी मारून आत्महत्या; प्रेयसीनं शेवटच्या क्षणी निर्णय बदलला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 16:10 IST