शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
2
Video: चीनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
3
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
4
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
5
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
6
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
7
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
8
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
9
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
11
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
12
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
13
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
14
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
15
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
16
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
17
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
18
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
19
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
20
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 

संस्कृती रक्षणानेच आधुनिक राक्षसांचा अंत शक्य इंद्रेशकुमार : राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे हिंदू चेतना महासंगम; १२५६ स्वयंसेवकांचा सहभाग

By admin | Updated: January 10, 2016 23:28 IST

सोबतफोटो-९२,१०३,१०४जळगाव : पा›ात संस्कृतीचे अंधानुकरण करून होणार्‍या दुष्परिणामांपासून वाचायचे असेल, महिला अत्याचार, भ्रष्टाचार, जातीभेद, अतिरेक आदी आधुनिक राक्षसांचा अंत करावयाचा असेल तर देशाने संस्कृती रक्षण करणे हाच उपाय असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य इंद्रेशकुमार यांनी व्यक्त केले.

सोबतफोटो-९२,१०३,१०४जळगाव : पा›ात संस्कृतीचे अंधानुकरण करून होणार्‍या दुष्परिणामांपासून वाचायचे असेल, महिला अत्याचार, भ्रष्टाचार, जातीभेद, अतिरेक आदी आधुनिक राक्षसांचा अंत करावयाचा असेल तर देशाने संस्कृती रक्षण करणे हाच उपाय असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य इंद्रेशकुमार यांनी व्यक्त केले.
आयएमआर महाविद्यालयाच्या मैदानावर रविवारी सायंकाळी संघातर्फे शहराचा हिंदू चेतना महासंगम कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा संघचालक राजेश नामदेव पाटील, शहर संघचालक उमाकांत गिरीधर नेहते, कार्यवाह हितेश सतीश पवार तसेच उद्योजक दीपक सुरेश चौधरी उपस्थित होते.
इंद्रेशकुमार म्हणाले की, नुकतेच भारतमातेच्या रक्षणासाठी काही जवानांनी बलिदान केले. त्यांना प्रणाम करतो. आपले स्वातंत्र्य, सुरक्षा, स्वाभीमान, रोजगार, विकास, समृद्धी याचा गॅरेंटर कोण? तर १०वी पास की पदवीधर होऊन फौजेत भारतमातेच्या रक्षणासाठी ग्लेशीयरवर उणे ४० अंशाच्या तापमानात उतार असलेला व समोरून चीनची गोळी झेलणारा तर कधी जैसलमेरमध्ये ५५ अंश तापमानात समोर पाकीस्तानची गोळी झेलणारा जवान. त्याने जर स्वत:चा विचार केला तर आपण गुलाम होऊ. त्यामुळेच देशासाठी बलिदान करणारा पूजनीय आहे. आरएसएस हे देखील असेच राष्ट्रीयतेचे पावन आंदोलन आहे. तर जगासाठी मानवतेचे पावन आंदोलन आहे. ते म्हणाले की संघ जातीभेद, पंथभद, भाषाभेद मानत नाही.
आज पुस्तकात कधीही नाव न ऐकलेले भ्रुणहत्या, बलात्कार, घरेलु हिंसा, भ्रष्टाचार, नक्षलवाद, आतंकवाद, हे आधुनिक रूपातील राक्षस आवासून आहेत. सर्व प्रकारची अभ्यासाची पुस्तके वाचली. त्यात या राक्षसांपासून मुक्तीसाठीचा उपाय, मार्ग सापडणार नाही. मात्र धर्म, सांस्कृतिक मूल्यांकडे गेला तर मार्ग निि›त सापडतो. त्यामुळे आपल्या सांस्कृतिक मूल्यांची जपणूक करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. भारतीय सभ्यता, संस्कृतीने आपण जगाला मार्ग दाखवू शकत नसू तर निदान स्वत:ला तरी वाचवू शकतो, असेही त्यांनी सांगितले.
कोणत्याही धर्माच्या जोडप्यांना लग्नाच्यावेळी मुलीच्या जन्माचा उत्सव साजरा करेन, महिलांवर अत्याचार करणार नाही, हुंडा घेणार नाही व मृत्यूनंतर मुलगी मुखाग्नी देईल असा चार ओळींचा मंत्र म्हणून त्याचे आयुष्यभर पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले. आधुनिक राक्षसांपासून मुक्ती हवी असेल तर ही क्रांती घडवावीच लागेल, असे आवाहनही त्यांनी केले. गरीबी, बेरोजगारीमुळे अपराध, धर्मांतर वाढते. त्याला आळा घालण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
---- इन्फो---
१२५६ स्वयंसेवक
राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे देवगिरी प्रांतात विविध महासंगमांचे आयोजन सुरू आहे. नुकताच पुणे येथे दीड लाख स्वयंसेवकांच्या उपस्थितीत शिवशक्ती संगम पार पडला. त्या पार्श्वभूमीवर जळगावला होणार्‍या हिंदू चेतना महासंगम विषयी उत्सुकता होती. संघ स्वयंसेवकांनी शहराचे ७ भाग करून संपर्क केला. त्यातील १५० उपवस्त्यांमधील १२५६ स्वयंसेवक उपस्थित होते. तसेच विशेष निमंत्रित ३०५ व १८५ नागरिक उपस्थित होते.
---- इन्फो---
संघ शाखेचे प्रात्यक्षिक
यावेळी संघाच्या कार्यपद्धतीची माहिती व्हावी यासाठी संघ शाखेचे प्रात्यक्षिकच स्वयंसेवकांनी सादर केले. त्यात शाखा लावणे, ध्वजवंदन, सूर्यनमस्कार, विविध खेळ त्यात व्यसनातून मुक्तता, शक्तीची नदी, कमांडो जंप, दंडप्रहार, पद्य आदी सर्व प्रकार सादर केले. व्यासपीठावर उपस्थित उद्योजक दीपक चौधरी यांनी संघाबद्दल फक्त ऐकून व वाचून होतो. मात्र ही कार्यपद्धती पाहून भारावून गेल्याचे मनोगत यावेळी व्यक्त केले.
---- इन्फो---
दिड तास उशीर
शिस्तप्रिय समजल्या जाणार्‍या संघाच्या जळगावातील या कार्यक्रमाची वेळ दुपारी ४ वाजेची होती. मात्र कार्यक्रमाला तब्बल दीड तास उशीर झाला. ५ वाजेपर्यंत तर स्वयंसेवकांचे देखील आगमन मैदानावर झालेले नव्हते. लाईट व माईक व्यवस्थेचे तसेच बैठक व्यवस्थेचेच काम सुरू होते. सायंकाळी ५.३० वा स्वयंसेवकांचे संघाने आगमन सुरू झाले. तर ५ वाजून३८ मिनिटांनी सजविलेल्या जीपवरून मान्यवरांचे आगमन झाले.