शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

...म्हणून त्यानं पसरवली विमानात बॉम्ब असल्याची अफवा; कारण वाचून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 17:59 IST

आई आणि मावशीला विमानाची सफर घडवण्यासाठी केलेली युक्ती एका तरुणाला भलतीच महागात पडली आहे.

नवी दिल्लीः आई आणि मावशीला विमानाची सफर घडवण्यासाठी केलेली युक्ती एका तरुणाला भलतीच महागात पडली आहे. आई आणि मावशीला विमानतळावर पोहोचण्यास उशीर झाल्यानं मुंबईतल्या एका तरुणानं फेक कॉल करून विमानात बॉम्ब असल्याची अफवा पसरवली. विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यामुळे विमानाला उड्डाण घेण्यास विलंब झाला. विशेष म्हणजे आई आणि मावशीला विमान पकडता आलेलं नसून उलट त्या तरुणालाच आता तुरुंगाची हवा खावी लागत आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे डीसीपी संजय भाटिया यांनी ही माहिती बुधवारी आयएएनएसला दिली होती. डीसीपीनं सांगितलं की, घटना मंगळवारी इंडिगो एअरलाइन्ससोबत घडली होती. आरोपीनं एअरलाइन्स ऑथोरिटीला फोन करून विमानात बॉम्ब असल्याचं सांगितलं होतं. सूचना मिळाल्यानंतर विमानतळावर सुरक्षेसाठी तैनात असलेले दिल्ली पोलीस आणि सीआयएसएफ(केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल)सह तपास यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या आहेत. चौकशीत ही सूचना खोटी असल्याची माहिती समोर आली आहे. हा सगळा बनाव मुंबईतल्या केशव नामक व्यक्तीनं रचला होता. केशवची आई आणि मावशीला इंडिगोच्या या विमानानं दिल्लीहून मुंबईला जायचं होतं. परंतु त्यांना वेळेत विमानतळावर पोहोचता येणार नसल्याचं समजल्यानंतर त्यानं ही शक्कल लढवली. विमान उड्डाणाला इतर प्रवाशांनाही उशीर झाला. पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेतलं असून, त्याची चौकशी सुरू आहे. 

टॅग्स :Indigoइंडिगो