शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या Zen-Z चा भाजपवर विश्वास;'BMC'च्या विजयानंतर बंगालमधून पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 18:50 IST

बीएमसी निवडणुकीत भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी Gen-Z बाबत भाष्य केले. देशाला भाजपच्या विकास मॉडेलवर विश्वास आहे, अशंही मोदी म्हणाले. पश्चिम बंगालमधील मालदा येथे एका जमावाला संबोधित करताना पंतप्रधानांनी केंद्राच्या विकासात ममता बॅनर्जी सरकारच्या भूमिकेवर टीका केली.

बीएमसी निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर भाजप नेत्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. शनिवारी पश्चिम बंगालमधील मालदा दौऱ्यावर असलेले पंतप्रधान मोदी यांनी बीएमसीच्या विजयानंतर कार्यकर्त्यांना बंगालमधील विजयासाठी तयारी करण्यास सांगितले. बीएमसी निवडणुकीत तरुण पिढीच्या योगदानाचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले की, भारतातील लोक भाजपच्या विकास मॉडेलवर विश्वास ठेवतात. ज्याप्रमाणे बीएमसी निवडणुकीत भाजपला विक्रमी विजय मिळाला, त्याचप्रमाणे बंगालचे मतदार यावेळीही भाजपला निवडून देतील, असंही मोदी म्हणाले.

मालदा येथे एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी सध्याच्या ममता बॅनर्जी सरकारवर टीका केली. त्यांनी बंगाली भाषेत "आय सरकार पलानो दोरकर" असे म्हटले.

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसंदर्भात दोन्ही राष्ट्रवादींचा मोठा निर्णय; काय ठरलं? पवारांच्या भेटीनंतर शशिकांत शिंदेंनी सांगितलं

पश्चिम बंगालमधील काही दिवसापूर्वी झालेल्या घडामोडींवरून ममता बॅनर्जी सरकारवर टीका करताना पंतप्रधान म्हणाले की, हे निर्दयी तृणमूल काँग्रेस सरकार सार्वजनिक निधीची लूट करत आहे. केंद्र सरकारच्या योजना बंगालच्या लोकांपर्यंत पोहोचण्यापासून रोखणारे राज्य सरकार आहे. तृणमूल काँग्रेसचा पराभव झाला आणि भाजप सत्तेत आला तरच बंगालचा विकास होऊ शकेल.

पश्चिम बंगालच्या सीमेला लागून असलेल्या राज्यांचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले की, ओडिशा, त्रिपुरा, आसाम आणि बिहारमध्येही भाजपची सरकारे आहेत. आता बंगालमध्ये भाजपचे सरकार सत्तेत आले पाहिजे. बंगालमध्ये पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान म्हणाले, "पश्चिम बंगालचा जलद विकास हा भारतीय जनता पक्षाचा प्राधान्यक्रम आहे. देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन बंगालमधून सुरू होत आहे ही आनंदाची बाब आहे."

पंतप्रधानांनी केंद्र सरकारच्या कामांची यादी वाचली

पंतप्रधानांनी ममता बॅनर्जी सरकारवर केंद्र सरकारच्या योजनांचे फायदे पश्चिम बंगालच्या लोकांपर्यंत पोहोचण्यापासून रोखल्याचा आरोप केला. ते म्हणाले, "मी बंगालच्या विकासासाठी काम करत आहे. सरकारच्या योजना योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात अशी माझी इच्छा आहे, पण तसे होत नाही. बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकार निर्दयी आहे. केंद्र सरकारने बंगालच्या विकासासाठी पाठवलेला पैसा तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांकडून लुटला जातो. त्यांना लोकांच्या दुःखाची काहीच पर्वा नाही. ते स्वतःचे तिजोरी भरण्यात व्यस्त आहेत."

English
हिंदी सारांश
Web Title : India's Zen-Z Believes in BJP: Modi Speaks After BMC Win

Web Summary : Riding high on the BMC victory, PM Modi urged BJP workers in West Bengal to prepare for victory. He criticized the Mamata Banerjee government for corruption and obstructing central schemes, promising development if BJP wins. Modi highlighted Bengal's first Vande Bharat train, emphasizing BJP's commitment to the state's progress.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBMC Electionsमुंबई महापालिका निवडणूक निकाल २०२६