शहरं
Join us  
Trending Stories
1
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
2
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
3
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
4
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
5
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
6
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
7
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
8
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
9
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
10
ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट
11
दुसरी मुलगी झाली म्हणून टोमणे; अमरावतीत ‘सीएचओ’ची आत्महत्या
12
व्लादिमीर पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर युक्रेनकडून ड्रोन हल्ला, बालंबाल बचावल्याचं वृत्त   
13
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
14
GT चं काही खरं नाही; तळाला असलेल्या CSK च्या बॅटर्संनी केला मोठा धमाका
15
रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला, ३६७ ड्रोन, क्षेपणास्त्रे डागली
16
Tejashwi Yadav : “मला हे आवडत नाही आणि मी ते सहनही करू शकत नाही”; तेजस्वी यादव यांनी स्पष्टच सांगितलं
17
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
18
'आमच्या 24 कोटी लोकांचे जीवन...', पाकिस्तानची सिंधू पाणी करारासाठी UN मध्ये धाव
19
सोन्याच्या तेजीचा फायदा घ्यायचाय? दागिन्यांऐवजी नाणे खरेदी करा; 'हे' आहेत ८ मोठे फायदे
20
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती

पडून असलेल्या साठ्यांमुळे भारताची गहू आयात थंडावली

By admin | Updated: May 18, 2017 06:19 IST

यंदा देशांतर्गत गव्हाचे प्रचंड उत्पादन झाले आहे, तसेच या आधी आयात केलेल्या गव्हाचे प्रचंड साठे देशाच्या विविध बंदरांवर पडून आहेत. त्यामुळे यंदा भारताची

- लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : यंदा देशांतर्गत गव्हाचे प्रचंड उत्पादन झाले आहे, तसेच या आधी आयात केलेल्या गव्हाचे प्रचंड साठे देशाच्या विविध बंदरांवर पडून आहेत. त्यामुळे यंदा भारताची गहू आयात थंडावली आहे.वाणिज्य आणि उद्योग क्षेत्राशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, बंदरावरील गव्हाचे साठे १.८ दशलक्ष टनांवर गेले आहेत. हा एक उच्चांकच आहे. बंदरावर पडून असलेल्या गव्हात प्रामुख्याने आॅस्ट्रेलिया आणि काळ््या समुद्राच्या परिसरातून आयात केलेला गहू आहे.एका व्यापाऱ्याने सांगितले की, आटा मिलवाले यंदा आयात केलेला गहू उचलायला तयार नाहीत. त्याऐवजी ते स्थानिक गव्हाला प्राधान्य देत आहेत. एक तर यंदा देशांतर्गत गव्हाचे उत्पादन प्रचंड झाले आहे, तसेच स्थानिक गव्हाची गुणवत्ताही चांगली आहे. गव्हाला चांगली मागणी राहील, असा अंदाज बांधून गव्हाची आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी आता ही बाब डोकेदुखीची ठरली आहे. भारताच्या विविध बंदरांवर गव्हाचे साठे पडून आहेत. यंदा गव्हाचे पीक सगळीकडेच चांगले आले आहे. त्यामुळे किमती उतरल्या आहेत. त्याचा फटका कृषी उत्पादनाच्या व्यवसायात असलेल्या बड्या कंपन्यांना बसत आहे. त्यात कारगील, बुंगे लिमिटेड, आर्कर डॅनिएल्स मिडलँड आणि लुइस ड्रेफस आदींचा समावेश आहे.अमेरिकी सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, जागतिक पातळीवर मका, गहू आणि सोयाबीन यांच्या साठ्यात सलग चौथ्या वर्षी वाढ झाली आहे. १९९0 दशकातील उत्तरार्धानंतरची ही सर्वाधिक दीर्घकालीन वाढ ठरली आहे. भारतात मात्र, गेल्या दोन वर्षांत गव्हाच्या पुरवठ्यात घसरण झाली होती. त्यामुळे आयात वाढली होती. यंदा परिस्थितीत सुधारणा झाल्यामुळे सरकारने आयातीवर १0 टक्के शुल्क लावले आहे.- पाऊस चांगला झाल्याने २०१६-१७ या काळात गव्हाचे उत्पादन ५.६ टक्के वाढून ९७.४ दशलक्ष टन एवढे आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर गेले आहे. - बंदरावरील गव्हाचे साठे १.८ दशलक्ष टनांवर गेले आहेत. हा एक उच्चांकच आहे.