शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कमी संख्याबळामुळे ‘इंडिया’ची माघार; लोकसभाध्यक्षपदी दुसऱ्यांदा ओम बिर्ला, आवाजी मतदानाने झाली निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 09:21 IST

पहिलाच दिवस गाजला ‘आणीबाणी’च्या उल्लेखाने.

संजय शर्मा

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : बलराम जाखड यांच्यानंतर ओम बिर्ला हे सलग दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्ष बनले आहेत. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ओम बिर्ला यांची ‘इंडिया आघाडी’चे के. सुरेश यांच्याशी लढत होती; मात्र आवाजी मतदानाने निर्णय बिर्ला यांच्या बाजूने लागला. संख्याबळाचा अभाव पाहता काँग्रेस आणि इंडिया आघाडीने मतदानाची मागणीही केली नाही. कालपर्यंत या निवडणुकीसाठी इंडिया आघाडी आग्रही होती. त्यासाठी तयारीही केली. कारण सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सर्वांत मोठी पहिली लढत होणार होती. पण, इंडिया आघाडीकडे संख्याबळ नसल्याचे दिसताच निवडणूक टळली. बिर्ला अध्यक्ष होताच त्यांनी आपल्या भाषणात आणिबाणीचा उल्लेख केला. त्यानंतर बराच गोंधळ उडाला.

लोकसभा अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची निवड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बिर्ला यांना सन्मानाने त्यांच्या आसनावर विराजमान केले. यावेळी पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांचे हस्तांदोलन चर्चेचा विषय ठरले.

तृणमूल राहिली दूर ओम बिर्ला यांच्या विरोधात लढण्यासाठी इंडिया आघाडीने के. सुरेश यांना उमेदवारी दिली होती; परंतु तृणमूल काँग्रेसने आधीच मतदानापासून दूर राहण्याची घोषणा केली होती. तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी आरोप केला होता की, इंडिया आघाडी व काँग्रेस नेत्यांनी उमेदवार उभे करण्यापूर्वी त्यांच्याशी चर्चाही केली नाही.

‘इंडिया आघाडी’चे संख्याबळ १९७इंडिया आघाडीच्या ७ खासदारांनी खासदार म्हणून शपथही घेतली नव्हती. त्यामुळे त्यांना मतदानात भाग घेता आला नसता. इंडिया आघाडीच्या खासदारांची एकूण संख्या २३३ आहे, त्यापैकी २९ तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी मतदानापासून दूर राहण्याची घोषणा केली होती. त्यामुळे इंडिया आघाडीच्या खासदारांची संख्या १९७ राहिली.

‘एनडीए’चे संख्याबळ ३०७ जगन मोहन रेड्डी यांच्या चार खासदारांच्या पाठिंब्याने आणि १० अपक्ष खासदारांच्या पाठिंब्याने सत्ताधारी पक्षाच्या ‘एनडीए’च्या खासदारांची संख्या २९३ होती, तर ओम बिर्ला यांच्या बाजूने असलेली संख्या ३०७ होती. जर इंडिया आघाडीने मतदानाची मागणी केली असती तर निकाल ३०७ विरुद्ध १९७ असा लागला असता.

टॅग्स :om birlaओम बिर्लाlok sabhaलोकसभाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी