शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रसारमाध्यमे स्वातंत्र्यात भारताचे स्थान घसरले; 'या' देशाला मिळाला सर्वांत शेवटचा नंबर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 09:23 IST

ताजिकिस्तान (१५३), तुर्कस्थान (१६५) या देशांतील प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य जपण्याबाबतची स्थिती चिंताजनक आहे

नवी दिल्ली : यावर्षीच्या जागतिक प्रसारमाध्यमे स्वातंत्र्य क्रमवारीत भारताची ११ क्रमांकांनी घसरण झाली आहे. त्याबद्दल देशातील प्रसारमाध्यमविषयक संघटनांनी चिंता व्यक्त केली. यावर्षी भारताला क्रमवारीत १६१ वे स्थान मिळाले. उत्तर कोरियाला सर्वात शेवटचा म्हणजे १८० वा क्रमांक मिळाला आहे.

रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर (आरएसएफ) या संघटनेच्यावतीने दरवर्षी ही क्रमवारी तयार करण्यात येते. प्रत्येक देशात प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य कसे जपले जाते, यावर या संघटनेचे बारीक लक्ष असते. त्यासाठी १८० देशांतील स्थितीचा विचार करण्यात येतो. गेल्यावर्षी या क्रमवारीत भारत १५० व्या क्रमांकावर होता.

ताजिकिस्तान (१५३), तुर्कस्थान (१६५) या देशांतील प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य जपण्याबाबतची स्थिती चिंताजनक आहे. यंदाच्या क्रमवारीत भारताची घसरण झाल्याबद्दल दी इंडियन वूमन प्रेस कॉर्प्स, प्रेस क्लब ऑफ इंडिया, दी प्रेस असोसिएशन यांनी एका संयुक्त पत्रकाद्वारे चिंता व्यक्त केली आहे.

स्वत:ला कमी लेखू नका... भारतासह काही देशांमध्ये प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य जपण्याबाबत स्थिती आणखी बिघडली आहे. जागतिक स्तरावर विकसनशील देशांमध्ये अजूनही अनेक क्षेत्रांत विषमता आहे. ही स्थिती सुधारण्यासाठी प्रसारमाध्यमे बजावत असलेल्या भूमिकेला कोणीही कमी लेखू नये, असे या पत्रकात म्हटले आहे.