शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

भारताचा पायलट पाकिस्तानमध्येच, त्याची सुखरूप सुटका करा, भारताची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2019 19:42 IST

आपला एक पायलट पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचे भारताने मान्य केले असून, युद्धकैद्यांसाठीच्या जिनेव्हा अॅक्टची अंमलबजावणी करून त्याला सुखरूपपणे मायदेशी पाठवावे, अशी मागणी भारताने केली आहे.  ​​​​​​​

नवी दिल्ली - भारतीय हवाई दलाने बालाकोट येथे केलेल्या एअर स्ट्राइकमुळे खवळलेल्या पाकिस्तानने आज भारताच्या हवाई हद्दीत घुसून हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र भारतीय हवाई दलाने हा हल्ला परतवून लावला होता. या चकमकीवेळी भारताचे एक विमान कोसळून एक पायलट पाकिस्तानच्या तावडीत सापडला होता. दरम्यान, आपला एक पायलट पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचे भारताने मान्य केले असून, युद्धकैद्यांसाठीच्या जिनेव्हा अॅक्टची अंमलबजावणी करून त्याला सुखरूपपणे भारतात पाठवावे, अशी मागणी भारताने केली आहे. पाकिस्तानी हवाई दलाने भारतीय हवाई हद्दीचे उल्लंघन करून हल्ला करण्याच्या केलेल्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर भारताने आज पाकिस्तानच्या उप उच्चायुक्तांना समन्स बजावले होते. त्यानंतर पाकिस्तानच्या उप उच्चायुक्तांसमोर पाकिस्तानने आज  भारतीय हवाई हद्दीच्या केलेल्या  उल्लंधनाबाबत निषेध नोंदवण्यात आला. तसेच भारताने बालाकोट येथे केलेला एअर सर्जिकल स्ट्राइक ही असैन्यिकी आणि दहशतवाद विरोधी हल्ला होता, असेही स्पष्ट करण्यात आले. तसेच पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय पायलटच्या सुरक्षिततेबाबत परराष्ट्र मंत्रालयाने चिंता व्यक्त केली. तसेच जखमी वैमानिकाला मारहाण करून पाकिस्तानने जिनेव्हा करारामधील मानवाधिकारासंबंधीच्या तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा आरोपही भारताने केला. त्याबरोबरच जिनेव्हा कराराला अनुसरून पाकिस्तानने या पायलटची सुटका करावी, अशी मागणी केली आहे. 

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकPakistanपाकिस्तानsurgical strikeसर्जिकल स्ट्राइक