शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लष्करावर सर्वाधिक खर्च करणाऱ्या टॉप 5 देशांत भारताचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2018 20:54 IST

लष्करावर सर्वाधिक खर्च करणा-या टॉप ५ देशांच्या यादीत भारताचा समावेश झाला आहे. भारत आता अमेरिका आणि चीन यांच्या पंगतीत जाऊन बसला आहे.

नवी दिल्ली : लष्करावर सर्वाधिक खर्च करणा-या टॉप ५ देशांच्या यादीत भारताचा समावेश झाला आहे. भारत आता अमेरिका आणि चीन यांच्या पंगतीत जाऊन बसला आहे. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटने (सिप्री) जारी केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. अहवालात म्हटले आहे की, २0१७ मध्ये भारताचा लष्करावरील खर्च ५.५ टक्क्यांनी वाढून ६३.९ अब्ज डॉलरवर गेला. भारताचा लष्करी खर्च आता फ्रान्सपेक्षा अधिक झाला आहे.अहवालात म्हटले आहे की, जगाचा लष्करावरील खर्च अल्प प्रमाणात वाढून १.७३ लाख कोटींवर गेला आहे. हा खर्च जागतिक सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या २.२ टक्के आहे. लष्करावर सर्वाधिक खर्च करणा-या देशांत अमेरिका आणि चीनचा दबदबा कायम आहे. अमेरिकेचा लष्करावरील खर्च ६१0 अब्ज डॉलर तर चीनचा २२८ अब्ज डॉलर आहे.सिप्रीने म्हटले की, चीन, भारत आणि सौदी अरेबिया यांचा लष्करावरील खर्च वाढल्यामुळे लष्करी समतोल आता आशिया, ओशिनिया आणि पश्चिम आशिया यांच्या बाजूने झुकला आहे. आशियात चीनचा लष्करी खर्च सर्वाधिक आहे. २0१७ मध्ये चीनचा लष्करी खर्च जागतिक लष्करी खर्चाच्या तुलनेत वाढून १३ टक्के झाला. २00८ मध्ये तो ५.८ टक्के होता. लष्करी खर्च वाढल्यामुळे चीनचा वृद्धीदर कमी झाला आहे............................वेतनावर अधिक खर्चइन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडीचे संशोधक लक्ष्मण कुमार यांनी सांगितले की, भारताचा लष्करी खर्च वाढला असला तरी वाढीव तरतुदीतील बहुतांश निधी वेतन आणि निवृत्ती वेतनावरच खर्च होत आहे. भारतीय लष्करात १.४ दशलक्ष सेवारत जवान असून २ दशलक्ष निवृत्ती वेतनधारक आहेत.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन