शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

भारताची आयआयटी आता टांझानियातही; भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 06:08 IST

भारतीय नौदलाचे जहाज ‘त्रिशूल’ सध्या टांझानियामध्ये आहे.

नवी दिल्ली/झांझिबार : भारताबाहेर परदेशातील पहिली भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) झांझिबार-टांझानिया येथे स्थापन केली जाईल आणि त्यासाठी दोन्ही देशांदरम्यान सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी दिली. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी हा करार झाला. तसेच भारतीय नौदलाचे जहाज ‘त्रिशूल’ सध्या टांझानियामध्ये आहे.

झांझिबार-टांझानियामध्ये आयआयटी मद्रासचे कॅम्पस स्थापन करण्यासाठी भारताचे शिक्षण मंत्रालय, आयआयटी मद्रास आणि टांझानियाचे शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण मंत्रालय यांच्यात ५ जुलैला सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यावेळी झांझिबारचे अध्यक्ष डॉ. हुसेन अली मिविनी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर उपस्थित होते. आयआयटी मद्रासचा हा प्रस्तावित कॅम्पस भारताबाहेरील आयआयटीचा पहिला कॅम्पस असेल.

द्विपक्षीय संबंध दृढ करण्यावर भरपरराष्ट्र मंत्री जयशंकर बुधवारी दोन दिवसांच्या दौऱ्यावर झांझिबारला पोहोचले. राष्ट्रपती डॉ. हुसेन अली मिविनी यांच्यासमवेत भारतीय नौदल जहाज ‘त्रिशूल’च्या स्वागत समारंभात ते सहभागी झाले. यावेळी जयशंकर म्हणाले, येथील आयएनएस त्रिशूलची उपस्थिती शांतता प्रस्थापित करेल. त्यातून प्रदेशातील समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी भारताची वचनबद्धता दिसते. दरम्यान, या भेटीदरम्यान त्यांनी द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली.