शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

शांततामय सहजीवनाचे भारत हे आदर्श उदाहरण- हसन रुहानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2018 18:27 IST

इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांच्या तीन दिवसांच्या दौऱ्याला कालपासून सुरुवात झाली आहे. रुहानी यांनी हैदराबाद शहराला भेट दिली असून ही त्यांची दुसरी हैदराबाद भेट असून राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतरची ही पहिली भेट आहे.

हैदराबाद- इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांच्या तीन दिवसांच्या भारत दौऱ्याला कालपासून सुरुवात झाली आहे. रुहानी यांनी हैदराबाद शहराला भेट दिली असून ही त्यांची दुसरी हैदराबाद भेट असून राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतरची ही पहिली भेट आहे. हैदराबादमध्ये त्यांनी गोवळकोंडा भागामध्ये असणाऱ्या कुतुबशाही कालीन थडग्यांना भेट दिली आहे. शांततामय सहजिवनाचे भारत हे आदर्श उदाहरण असल्याचे रुहानी यांनी हैदराबादमध्ये असताना सांगितले.हसन रुहानी या परिसरामध्ये सकाळी 9 वाजता पोहोचले, त्यानंतर तेथील अधिकाऱ्यांनी त्या परिसराचे ऐतिहासिक महत्त्व सांगितले, असे पश्चिम विभागाचे डीसीपी व्यंकटेश्वर राव यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना सांगितले. भारत विविध वंशांचे, धर्मांचे शांततामय सहजीवन असणारे संग्रहालय आहे. ही शांततेची प्रक्रिया गेली अनेक वर्षे येथे सुरू आहे. शिया, सुन्नी, सुफी, हिंदू, शीख आणि इतर धर्मीय येथे एकत्र राहतात. त्यांनी एकत्र येऊन या देशाची आणि संस्कृतीची निर्मिती केली, असे रुहानी यांनी पर्शियनमधून केलेल्या भाषणामध्ये मत व्यक्त केले. भारत आणि इराण यांच्यामध्ये असणारे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध राजकीय आणि आर्थिक संबंधांच्या पलिकडचे आहेत. या दोन्ही महान देशांच्या नागरिकांचे मूळ समान आहे, असेही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.आपला देश अफगाणिस्तान, इराक, सीरिया, येमेनसारख्या देशांना मदत करण्यासाठी तयार होता असेही रुहानी यावेळेस सांगितले. इराक आणि सीरियामध्ये पश्चिमेकडील देशांनी अशांतता प्रस्थापित करेपर्यंत शिया, सुन्नी, कुर्द, ख्रिश्चन एकत्र सुखनैव नांदत होते, असे सांगत त्यांनी पाश्चिमात्य देशांवर इराक व सीरियामधील हस्तक्षेपावरून टीका केली.