शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक क्रिकेटमध्ये भारताचे खच्चीकरण

By admin | Updated: April 27, 2017 02:08 IST

कसोटी क्रिकेटचा दर्जा असलेल्या १० देशांमध्ये पैशाच्या दृष्टीने सर्वांत श्रीमंत असूनही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा

नवी दिल्ली : कसोटी क्रिकेटचा दर्जा असलेल्या १० देशांमध्ये पैशाच्या दृष्टीने सर्वांत श्रीमंत असूनही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) जागतिक क्रिकेटमधील दबदबा धोक्यात आला आहे. जागतिक क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) नियामक मंडळाच्या दुबईमध्ये बुधवारी झालेल्या बैठकीत सध्याची प्रशासकीय रचना आणि महसुलाचे वाटप यात आमूलाग्र बदल करण्याचे भारताला मारक ठरणारे ठराव मोठ्या बहुमताने मंजूर करण्यात आले.विशेष म्हणजे पैसा आणि सत्ता या दोन्ही बाबतींत ‘बीसीसीआय’चे पंख छाटण्याचे हे काम याच ‘बीसीसीआय’चे पूर्वी अध्यक्ष राहिलेल्या शशांक मनोहर यांच्या नेतृत्वाखाली झाले. ‘आयसीसी’चे पहिले त्रयस्थ अध्यक्ष या नात्याने मनोहर यांच्याच अध्यक्षतेखाली दुबईतील ही बैठक झाली. ‘आयसीसी’चे एकूण १० पूर्ण सदस्य आहेत. बैठकीत प्रशासकीय रचनेत बदल करण्यासंबंधीचा ठराव एकटा भारत वगळून इतर सर्व सदस्य देशांच्या संमतीने म्हणजे १-९ अशा बहुमताने संमत झाला. भारताचे प्रतिनिधी अमिताभ चौधरी यांनी एकट्यानेच ठरावाच्या विरोधात मतदान केले. महसुलाच्या वाटपाचे सूत्र बदलण्यासंबंधीचा ठरावही नियामक मंडळाने ८-२ अशा बहुमताने मंजूर केला. भारताच्या चौधरींसोबत श्रीलंका क्रिकेट मंडळाच्या तिलंगा सुमतीपाला यांनी ठरावास विरोध केला.महसूल वाटपाच्या प्रचलित सूत्रानुसार भारत, आॅस्ट्रेलिया आणि इंग्लंड या तीन देशांना सर्वाधिक वाटा मिळत आला आहे. त्याऐवजी सर्व सदस्य देशांना समन्यायी वाटप करण्याच्या नव्या सूत्राचा पर्याय मनोहर यांनी मांडला होता. तो बहुमताने मंजूर झाला. यामुळे ‘बीसीसीआय’चा महसुलातील वाटा ५७० दशलक्ष डॉलरवरून त्याच्या निम्म्यावर येणार आहे.मंजूर झालेल्या प्रशासकीय बदलांमुळे ‘आयसीसी’च्या घटनेत सुधारणा करावी लागेल, पूर्ण आणि सहयोगी सदस्यत्वाचा फेरआढावा घेतला जाईल आणि कसोटी क्रिकेटही द्विस्तरीय होईल. चॅम्पियन्स ट्रॉफीपुढे प्रश्नचिन्हआजच्या या घडामोडीनंतर यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील भारतीय संघाच्या सहभागापुढील प्रश्नचिन्हही कायम राहिले आहे. संघ निवडून तो जाहीर करण्याची मुदत मंगळवारी संपली तरी भारतीय संघ जाहीर केला गेलेला नाही. मग आता भारत या स्पर्धेत खेळणार नाही का, असे विचारता मंडळाचा हा अधिकारी म्हणाला की, आमच्यापुढे सर्व पर्याय खुले आहेत. आयसीसीने आधी ठरलेल्या स्पर्धेतील सहभागाविषयीच्या कराराचे पालन केलेले नाही. (वृत्तसंस्था)

पुन्हा विशेष सर्वसाधारण सभा-आजच्या बैठकीत काय भूमिका घ्यायची हे ठरविण्यासाठी ‘बीसीसीआय’ने त्यांच्या सदस्यांची विशेष सर्वसाधारण सभा घेतली होती. त्यात बैठकीला जाणाऱ्या मंडळाच्या प्रतिनिधीला दोन पर्याय मंजूर करण्यात आले होते. पहिला म्हणजे, या दोन्ही विषयांवरील निर्णय पुढे ढकलण्याची विनंती करणे आणि दुसरा, तरीही मतदान झालेच तर दोन्ही मुद्द्यांवर विरोधी मतदान करणे. त्यानुसार आमच्या प्रतिनिधीने निर्णय पुढे ढकलण्याची विनंती केली. ती अमान्य झाल्यावर दोन्ही ठरावांवर विरोधी मतदान केले. आता पुन्हा विशेष सर्वसाधारण सभा घेऊन त्यात आजच्या या निर्णयांची माहिती देऊन पुढे काय करायचे यावर विचार केला जाईल, असे ‘बीसीसीआय’च्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.मनोहर हेच व्हिलनबीसीसीआयच्या सध्याच्या प्रशासनाला पाण्यात पाहणारे शशांक मनोहर आयसीसीचे अध्यक्ष असल्याने आम्हाला विरोध अपेक्षित होता. पण झिम्बाब्वे व बांगलादेश या दोन देशांनी आश्वासन देऊनही पाठिंबा दिला नाही याचे आश्चर्य वाटते.- बीसीसीआय पदाधिकारी